• Download App
    जम्मू-काश्मिरात २४ तासांमध्ये ३ चकमकींत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, खोऱ्यात लष्कराच्या मोहिमेला वेग । jammu kashmir three encounters in 24 hours security forces killed 5 terrorist

    जम्मू-काश्मिरात २४ तासांमध्ये ३ चकमकींत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, खोऱ्यात लष्कराच्या मोहिमेला वेग

    jammu kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ‘ऑल आउट’ ऑपरेशन सुरू आहे. मागच्या 24 तासांत जम्मू -काश्मीरमध्ये तीन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापैकी काही दहशतवादी नुकत्याच झालेल्या सामान्य नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी होते. मात्र, या कारवाईदरम्यान जेसीओसह लष्कराचे 5 जवानही शहीद झाले आहेत. jammu kashmir three encounters in 24 hours security forces killed 5 terrorist


    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ‘ऑल आउट’ ऑपरेशन सुरू आहे. मागच्या 24 तासांत जम्मू -काश्मीरमध्ये तीन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापैकी काही दहशतवादी नुकत्याच झालेल्या सामान्य नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी होते. मात्र, या कारवाईदरम्यान जेसीओसह लष्कराचे 5 जवानही शहीद झाले आहेत.

    तीन चकमकींमध्ये 5 दहशतवादी ठार

    अनंतनागामध्ये सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या चकमकीदरम्यान जम्मू -काश्मीर पोलिसांचा एक जवानही जखमी झाला आहे. आतापर्यंत या दहशतवाद्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

    बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई केली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद दार असे असून तो लष्कर-ए-तैयबा (टीआरएफ) शी संबंधित होता. या दहशतवाद्याचा शाहगुंडमध्ये एका सामान्य नागरिकाच्या हत्येत सहभाग होता.

    शोपियानमध्ये लष्कराने रात्री उशिरा जिल्ह्यातील तुलरान परिसरात शोधमोहीम सुरू केली. अनेक तास चाललेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दानिश अहमद, यावर अहमद आणि मुख्तार अहमद अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि एक एके -47 देखील जप्त करण्यात आली आहेत. मुख्तार अहमद गंदरबल येथील एका नागरिकाच्या हत्येत सहभागी होता.

    5 जवान शहीद

    जम्मूच्या पूंछ जिल्ह्यातही लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे दहशतवादविरोधी कारवाई केली. हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चामेर जंगलात पोहोचले होते. इनपुट मिळताच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद झाले.

    या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये नायब सुभेदार (जेसीओ) जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग, शिपाई गज्जन सिंग, सराज सिंह आणि वैशाख एच. शहीद सैनिकांमध्ये तीन जसविंदर सिंह, मनदीप सिंग आणि गजन सिंह हे पंजाबचे रहिवासी होते. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी शहिदांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची भरपाई जाहीर केली आहे.

    jammu kashmir three encounters in 24 hours security forces killed 5 terrorist

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ