terrorists hurl grenade at CRPF party : जम्मू-काश्मीरमधील त्राल बसस्थानकात स्फोट झाला आहे. यामध्ये एकूण 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) सांगितले की, दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करून हा स्फोट घडवून आणला. हवेत ग्रेनेडचा स्फोट झाला, त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. हा हल्ला तेथील सीआरपीएफ पथकावर केल्याचे सांगण्यात येत आहे. Jammu & Kashmir Seven civilians sustain minor injuries as terrorists hurl grenade at CRPF party at bus stand in Pulwama’s Tral
वृत्तसंस्था
त्राल : जम्मू-काश्मीरमधील त्राल बसस्थानकात स्फोट झाला आहे. यामध्ये एकूण 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) सांगितले की, दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करून हा स्फोट घडवून आणला. हवेत ग्रेनेडचा स्फोट झाला, त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. हा हल्ला तेथील सीआरपीएफ पथकावर केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बॉम्बस्फोटाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला असून शोध मोहीम सुरू आहे.
स्फोटाचे कारण ग्रेनेड असल्याचे मानले जात आहे कारण त्या ग्रेनेडची पिन बसस्थानकात सापडली आहे. हल्ल्यात ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
जखमींना एसडीएच तिरल रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला श्रीनगरला रेफर करण्यात आले. सध्या इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे.
Jammu & Kashmir Seven civilians sustain minor injuries as terrorists hurl grenade at CRPF party at bus stand in Pulwama’s Tral
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अनलॉक मॉडेलचे उद्योगपतींकडून कौतुक, देशभर राबविण्याचे केले आवाहन
- कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा देशातील कृषी क्षेत्रावर परिणाम नाही, नीती आयोगाने व्यक्त केला विश्वास
- रेशन डिलिव्हरीप्रकरणी केजरीवाल यांच्यावर भाजपचा पलटवार, मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीतील जनतेची दिशाभूल
- केजरीवाल सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात अडथळा आणू नये, दिल्लीतील घरपोच रेशन योजनेवर केंद्राचे उत्तर
- गुगल, फेसबुकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर 15 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय, G-7 देशांमध्ये ऐतिहासिक करार