Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरच्या शोपियांतील कुशवा भागात गुरुवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, काल रात्री अनायत अशरफ दार या दहशतवाद्याने कुशवा गावात एका नागरिकावर गोळीबार केला आणि त्याला जखमी केले. Jammu Kashmir one terrorist killed in an encounter Shopian
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या शोपियांतील कुशवा भागात गुरुवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, काल रात्री अनायत अशरफ दार या दहशतवाद्याने कुशवा गावात एका नागरिकावर गोळीबार केला आणि त्याला जखमी केले.
सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर, काश्मीर पोलिसांनी कुशवा गावात CASO ऑपरेशन सुरू केले आणि परिसराला घेराव घातला. ते म्हणाले की, दहशतवाद्याला आधी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, पण त्याने तसे केले नाही. नंतर तो चकमकीदरम्यान ठार झाला. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. जखमी नागरिक अजूनही रुग्णालयात दाखल आहे.
गोळी लागलेल्या व्यक्तीचे नाव जमीर अहमद भट असून ते व्यवसायाने दुकानदार आहेत आणि डांगरपोरा चित्रगम कलां येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. जम्मू -काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “रात्री 9:45 च्या सुमारास शोपियान पोलिसांना शोपियांमधील चित्रगाम कलां भागात दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली, जिथे दहशतवाद्यांनी एका नागरिकावर गोळीबार केला.
Jammu Kashmir one terrorist killed in an encounter Shopian
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानला मान्यता देण्यासाठी चीनचा उतावीळपणा, आर्थिक निर्बंध लवकर उठवण्याचे जगाला केले आवाहन
- हत्या की आत्महत्या? : नरेंद्र गिरींच्या मृत्यूशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर, मृतदेह लटकलेला होता, तर पंखा सुरू कसा?
- हरीश रावत यांच्या वक्तव्यामुळे नाराज सुनील जाखड दिल्लीला रवाना, राहुल-प्रियांकांसोबत घेणार बैठक
- PM Modi in US : पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये म्हणाले, भारतीय प्रवासी ही देशाची सर्वात मोठी ताकद
- पीएम मोदी अमेरिकेत पहिल्या दिवशी या नेत्यांना भेटणार, जागतिक सीईओंशी चर्चा, असे आहे पंतप्रधानांच्या पहिल्या दिवसाचे वेळापत्रक