• Download App
    जम्मू-काश्मीर: तब्बल ७० कोटींच्या ११ किलो 'हेरॉईन'सह दोन पाकिस्तानी तस्करांना अटकJammu and Kashmir Two Pakistani smugglers arrested with 11 kg of heroin worth Rs 70 crore

    जम्मू-काश्मीर: तब्बल ७० कोटींच्या ११ किलो ‘हेरॉईन’सह दोन पाकिस्तानी तस्करांना अटक

    ११.८२ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे; पाकिस्तानतून ही खेप पाठवण्यात आल्याचे केले कबुल

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : सीमेपलीकडून होणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ७० कोटी रुपयांचे ११ किलो हेरॉईन आणि ११.८२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही खेप पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याची कबुली दोघांनी चौकशीदरम्यान दिली आहे. Jammu and Kashmir Two Pakistani smugglers arrested with 11 kg of heroin worth Rs 70 crore

    काश्मीरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) विजय कुमार यांनी ट्विट केले की, ‘दोन सीमापार तस्कर सज्जाद बदाना आणि झहीर तंच यांना श्रीनगर पोलिसांनी कर्नाह कुपवाडा येथून अटक केली आहे. तस्करांकडून ११.८९ किलो हेरॉईन (आंतरराष्ट्रीय बाजारात ७० कोटी रुपये किमतीचे) आणि ११,८२,५०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

    अधिकाऱ्याने सांगितले की, तस्करांविरुद्ध राजबाग पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एडीजीपीने सांगितले की हे ड्रग पाकिस्तानातून आले होते.

    Jammu and Kashmir Two Pakistani smugglers arrested with 11 kg of heroin worth Rs 70 crore

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती