दोन मजुरांचाही मृत्यू याशिवाय दोन जवान जखमी झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : Jammu and Kashmir LOCजवळ दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले, तर लष्करासाठी काम करणाऱ्या दोन मजुरांचाही मृत्यू झाला. दोन जवान जखमी झाले आहेत.Jammu and Kashmir
एलओसीजवळील बोटापठार गुलमर्ग येथील नागिन पोस्ट परिसरात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, लष्कराकडून दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे. हा घुसखोरीचा प्रयत्न असू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, उत्तर काश्मीरमधील बुटा पाथरी भागात लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी आहे ज्यात काही लोक ठार आणि जखमी झाले आहेत. काश्मीरमधील अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांची ही मालिका गंभीर चिंतेची बाब आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या प्रियजनांप्रती मी शोक व्यक्त करतो. जखमी लोक पूर्ण आणि लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.
Jammu and Kashmir Terrorist attack on army vehicle near LOC two soldiers martyred
महत्वाच्या बातम्या
- Congress : राजस्थानमध्ये काँग्रेसची दोन पक्षांसोबतची युती संपुष्टात!
- Rajesh Pandey राजेश पांडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती
- Maharashtra Elections : पवारांनी दिले आव्हान, तरी नाही माघार; “हरियाणा” रिपीट करायला मोदी 8 दिवस महाराष्ट्रात!!
- Delhi Jamia University : दिल्लीच्या जामिया विद्यापीठात दोन गटांमध्ये वाद; पॅलेस्टाईन झिंदाबादच्या घोषणा दिल्या, विद्यार्थिनींवर अभद्र कमेंट