Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या 11 सरकारी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली. दहशतवादी सय्यद सलाउद्दीनच्या दोन मुलांनाही काढून टाकण्यात आले आहे. Jammu and Kashmir government fires 11 govt employees linked to terrorists, takes action against Syed Salahuddin’s two sons
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या 11 सरकारी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली. दहशतवादी सय्यद सलाउद्दीनच्या दोन मुलांनाही काढून टाकण्यात आले आहे.
शिक्षण विभागाचे चार कर्मचारी
नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या 11 सरकारी कर्मचार्यांपैकी चार अनंतनाग, तीन बडगाम आणि बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा आणि कुपवाडा येथील प्रत्येकी एक आहेत. 11 पैकी 4 जण शिक्षण विभागात कार्यरत होते, जम्मू-काश्मीर पोलिसांत दोन आणि कृषी, कौशल्य विकास, विद्युत, एसकेआयएमएस आणि आरोग्य क्षेत्रातील एक जण होता.
देशविरोधी कार्यात आढळले दोन शिक्षक
सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आलेले जम्मू-काश्मीरमधील 11 सरकारी कर्मचार्यांपैकी अनंतनागमधील दोन शिक्षक देशविरोधी कारवायांमध्ये आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल दहशतवाद्यांना अंतर्गत माहिती पुरविण्यात मदत करणारे आढळले आहे. अतिशय गंभीर बाब म्हणून या 11 जणांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
Jammu and Kashmir government fires 11 govt employees linked to terrorists, takes action against Syed Salahuddin’s two sons
महत्त्वाच्या बातम्या
- Khadi Brand : खादी ब्रँड निश्चितीसाठी 40 देशांत अर्ज, भूतान, यूएई आणि मेक्सिकोमध्येही ट्रेडमार्कची नोंदणी
- Solar Storm : 16 लाख किमी प्रति तासाच्या वेगाने येतंय महाविध्वंसक सौर वादळ, उद्या पृथ्वीला धडकण्याचा शास्त्रज्ञांचा इशारा
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत