• Download App
    Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; यामध्ये 19 उमेदवारांची नावे

    Jammu and Kashmir

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir )  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी (9 सप्टेंबर) तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये आरएस पुरा-जम्मू दक्षिणमधून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमण भल्ला, बसोलीमधून चौधरी लाल सिंग आणि बिश्नाह (एससी) मधून माजी एनएसयूआय प्रमुख नीरज कुंदन यांना तिकीट देण्यात आले आहे.

    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत एकूण 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये जागावाटपही निश्चित झाले आहे. नॅशनल कॉन्फरन्स ५१ तर काँग्रेस ३२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. सीपीआय(एम) आणि पँथर्स पार्टीला 2 जागा मिळाल्या आहेत.



    पहिल्या 2 यादीत 15 नावे जाहीर करण्यात आली

    काँग्रेसने गेल्या आठवड्यात सहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. रियासी येथून मुमताज खान यांना तिकीट देण्यात आले आहे. इफ्तार अहमद यांना राजौरीतून रिंगणात उतरवले आहे. भूपेंद्र जामवाल यांना श्री माता वैष्णोदेवी येथून तिकीट देण्यात आले आहे. तारिक हमीद कारा यांना सेंट्रल शालतेंग येथून तिकीट देण्यात आले आहे. शविद अहमद खान यांना थन्नामोंडीतून, मोहम्मद शाहनवाज चौधरी यांना सुरणकोटमधून तिकीट देण्यात आले आहे.

    यापूर्वी पक्षाने 9 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. उल्लेखनीय आहे की, जम्मू-काश्मीरच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिला टप्पा 18 सप्टेंबर, दुसरा टप्पा 25 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा 1 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

    दहशतवादी अफजल गुरूचा भाऊही मैदानात

    संसद हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूचा भाऊ एजाज गुरू, सोपोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या ३० उमेदवारांपैकी एक आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

    Jammu and Kashmir Assembly Elections, Congress Third List Announced; Names of 19 candidates in this

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र