• Download App
    Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या तिसऱ्या यादीत 29 नावे

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या तिसऱ्या यादीत 29 नावे; काल हटवलेल्या यादीतील 28 उमेदवारांची नावे रिपीट

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 29 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 10 आणि तिसऱ्या टप्प्यातील 19 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. जम्मूतील वादानंतर 26 ऑगस्ट रोजी पक्षाने 5 तासांत 3 याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत 44 नावे होती, विरोध झाल्यावर सर्व नावे मागे घेण्यात आली. नंतर 15 नावे आणि नंतर एक नाव जाहीर केले. 26 ऑगस्ट रोजी जम्मूतील पक्ष कार्यकर्त्यांनी पहिल्या यादीला विरोध केला होता. प्रदेशाध्यक्षांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. त्यानंतरच 44 नावांची पहिली यादी थांबवण्यात आली.

    आज जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत पक्षाने कालच्या २८ नावांची पुनरावृत्ती केली आहे. केवळ श्रीमाता वैष्णोदेवी मतदारसंघातून पक्षाने रोहित दुबे यांचे नाव बदलून बलदेव राज शर्मा यांना तिकीट दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागतील. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 46 आहे.

    मोदी-शहांसह 40 स्टार प्रचारक केले

    जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचारासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत शिवराज चौहान, योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणी यांचीही नावे आहेत.

    29 names in BJP’s third list in Jammu and Kashmir

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र