जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि सविस्तर माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. हरियाणात 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
हरियाणात पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबरला होणार आहे. याशिवाय तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका ३ टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबरला होणार आहे. याशिवाय तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित करताना सांगितले, ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुका ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. ती यशस्वीपणे आणि शांततेत पूर्ण झाली. याने एक मजबूत लोकशाही पाया तयार केला, ती कोणत्याही हिंसाचाराशिवाय शांततापूर्ण होती आणि संपूर्ण देशाने निवडणूक साजरी केली. आम्ही अनेक विक्रमही केले. जगात पहिल्यांदाच सर्वाधिक मतदान झाले.
Jammu and Kashmir and Haryana assembly election dates announced
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!