केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. Jammu and Kashmir
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : येथील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. खोऱ्यात तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत राजकीय पक्षांमध्येच नव्हे तर मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर, राज्य जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. त्यानंतर येथे विधानसभेची निवडणूक झाली नाही. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुक होत आहे.
केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील एकूण 24 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला होणार आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.
Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जम्मू आणि काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील 24 जागांसाठी एकूण 219 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १९ अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली, ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
निवडणूक आयोगानुसार पहिल्या टप्प्यात एकूण 23.27 लाख मतदार मतदान करतील. यामध्ये 11.76 लाख पुरुष आणि 11.51 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी 5.66 लाख तरुण मतदार आहेत तर 60 तृतीय लिंग मतदारही मतदान करत आहेत. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत, शेवटच्या विधानसभा निवडणुका 2014 मध्ये खोऱ्यात झाल्या होत्या. दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे.
पहिल्या टप्प्यात ज्या सात जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियान, कुलगाम, रामबन, डोडा आणि किश्तवार यांचा समावेश आहे. या सात जिल्ह्यांतील विधानसभेच्या एकूण २४ जागांवर मतदान होत आहे. विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी बीएसएफ, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यासाठी घेण्यात आलेल्या सुरक्षा आढाव्यात येथे आवश्यकतेपेक्षा जास्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
1.17 percent polling in Jammu and Kashmir till 1 pm
महत्वाच्या बातम्या
- Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मनातल्या मुख्यमंत्र्यांची जोरदार स्पर्धा; पण नाव जाहीर करण्याची कुणाचीही हिंमतच होईना!!
- Hockey : चिनी भूमीवर चीनवर मात करून भारत हॉकीत एशियन चॅम्पियन; ऑलिंपिकचे तिकीट निश्चित!!
- Adani Green Energy : अदानी ग्रीन एनर्जी महाराष्ट्र सरकारला 6600 मेगावॅट वीज पुरवेल