विशेष प्रतिनिधी
आझमगढ : भारतीय जनता पक्षाच्या सरकारसाठी जाम शब्दाचा अर्थ आहे जनधन बॅँक खाते, आधार कार्ड आणि प्रत्येकासाठी मोबाईल. मात्र, समाजवादी पार्टीसाठी जामचा अर्थ जिन्ना, आझम खान आणि मुख्तार आहेत, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.Jam means Jandhan Bank account , Aadhar card and mobile for everyone for us, while for SP, Jinnah, Azam Khan and Mukhtar, Amit Shah’s attack.
आझमगढ येथे विद्यापीठाच्या भूमिपूजन समारंभात शहा यांनी माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोदरार हल्ला केला. उत्तर प्रदेशातील राजकारणात सुरू असलेल्या जिन्ना मुद्यावरून त्यांनी जाम शब्दाचा अर्थच समजावून सांगितला.
शहा म्हणाले, समाजवादी पक्षाच्या शासनकाळात दहशतवाद ही आझमगढची ओळख होती. मात्र, आज याच ठिकाणी विद्यापीठ सुरू होत आहे. ही परिवर्तनाची सुरूवात आहे. समाजवादी पक्षाच्या काळात आझमगढची ओळख कट्टरपंथियांचे शहर अशी बनली होती. मात्र,आता आझमगढ शिक्षणाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. या विद्यापीठाचे नामकरण महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने होत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे कौतुक करताना शहा म्हणाले, उत्तर प्रदेशातील माफियाराजचा खात्मा झालाआहे. आम्ही निवडणुकीत आश्वासन दिले होते की राज्यात दहा विद्यापीठांची स्थापना केली जाईल. आज दहावे विद्यापीठ सुरू होत आहे. २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात केवळ १० वैद्यकीय महाविद्यालये होती. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे ४० महाविद्यालये सुरू केली आहेत.
उत्तर प्रदेशात पूर्वी जातीयवादाचे, परिवारवादाचे तृष्टीकरण केले जात होते. परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे बंद केले. २०१५ पूर्वी उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था देशात सहाव्या क्रमांकावर होती. आज प्रथम क्रमांकावर आहे. जीडीपी २० लाख करोड होता, आज ३२ लाख करोड आहे. बेरोजगारीचा दर कमी होऊन ४.१ टक्के झाला आहे.
पूर्वी चारच विमानतळ होते. आज आठ आहेत. एक्सप्रेस वेची संख्या दुप्पट झाली आहे. सगळे माफिया उत्तर प्रदेशातून पळाले आहेत. आता येथे कायद्याचे राज्य आहे. माफियांची हजारो एकर जमी जप्त करून त्याठिकाणी विकासकामे सुरू झाली आहेत.
Jam means Jandhan Bank account , Aadhar card and mobile for everyone for us, while for SP, Jinnah, Azam Khan and Mukhtar, Amit Shah’s attack.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी