ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी साहित्य पाठवण्यात आल्याची गुप्त माहिती
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या तत्परतेने दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला आहे. रविवारी (21 मे) एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली. मोहम्मद उबैद मलिक असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुपवाडा येथील रहिवासी आहे. उबैद पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैशच्या कमांडरच्या सतत संपर्कात होता. Jaish e Mohammed terrorist arrested There was a conspiracy to make a big attack in India
दहशतवादी उबैद जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट राबवण्याचा प्रयत्न करत होता. अटक करण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या कमांडरला लष्कर आणि सुरक्षा दलांच्या हालचालींशी संबंधित माहिती पाठवत होता.
एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी दहशतवादी गुप्त माहिती, विशेषत: सैन्य आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैश कमांडरला देत होता. एनआयएने आरोपींकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातील अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केली आहेत.
गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर –
स्वत:हून दखल घेत, एजन्सीने 21 जून 2022 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी साहित्य पाठवण्यात आल्याची गुप्त माहिती एनआयएला मिळाली होती. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा सतर्क होत्या. याप्रकरणी एनआयएला आज मोठे यश मिळाले आहे.
ड्रोनद्वारे स्फोटके पाठवली जात होती –
एनआयएच्या तपासानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी ड्रोनद्वारे अनेकदा आयईडी आणि स्फोटके पाठवली जात आहेत. स्थानिक पातळीवरही स्फोटक साहित्य गोळा केले जात आहे. या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने अल्पसंख्याक आणि सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Jaish e Mohammed terrorist arrested There was a conspiracy to make a big attack in India
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क