• Download App
    जयराम रमेश म्हणाले, INDI आघाडी 48 तासांत पंतप्रधान निवडेल; फडणवीस म्हणाले, मुंगेरीलाल के हसीन सपने!! Jairam Ramesh said, INDI alliance will choose the Prime Minister within 48 hours

    जयराम रमेश म्हणाले, INDI आघाडी 48 तासांत पंतप्रधान निवडेल; फडणवीस म्हणाले, मुंगेरीलाल के हसीन सपने!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडत असताना त्याचा प्रचार आज 30 मे रोजी संपणार आहे. त्याआधी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मोठे वाग्युद्ध रंगले आहे. Jairam Ramesh said, INDI alliance will choose the Prime Minister within 48 hours

    काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस किंवा INDI आघाडीच्या पंतप्रधान पदाची चिंता तुम्ही करू नका. INDI आघाडी 48 तासांमध्ये पंतप्रधान पदाचा नेता निवडेल, असे वक्तव्य केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मुंगेरीलाल के हसीन सपने” असे म्हणून उत्तर दिले.

    पीटीआयच्या मुलाखतीत जयराम रमेश म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत पहिले दोन टप्पे पार पडल्यावरच हे लक्षात आले की, भाजप “दक्षिण मे साफ आणि उत्तर मे हाफ”!! त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर भाजपची हार झाली आहे. नरेंद्र मोदी हे मावळते पंतप्रधान आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचे गृहमंत्री अमित शाह हे देखील मावळते आहेत. 4 जून रोजी निकाल लागल्यावर INDI आघाडी बहुमताचा 272 चा आकडा सहज पार करेल.

    पंतप्रधान पदाबद्दल मीडियामध्ये जेवढी चर्चा आहे किंवा त्यांना जेवढी काळजी वाटते, तेवढी काळजीची स्थिती नाही. INDI आघाडीचे नेते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 48 तासांमध्ये पंतप्रधान पदाचा नेता निवडतील. ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतील, त्याच पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

    काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या वेगवेगळ्या डाव्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ काशी मधून उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, माझ्या लहानपणी दूरदर्शनवर एक सिरीयल होती तिचे नाव “मुंगेरीलाल के हसीन सपने” असे होते. काँग्रेस आणि INDI आघाडीचे नेते कितीही स्वप्ने पाहू द्या. स्वप्नं पाहायला पैसे पडत नाहीत, पण काँग्रेस आणि INDI आघाडीची देशात सत्तेवर येण्याची स्वप्ने “मुंगेरीलाल की हसीन सपनेच” ठरणार आहेत!!

    Jairam Ramesh said, INDI alliance will choose the Prime Minister within 48 hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!