• Download App
    याला म्हणतात, मोदींचा फुकट प्रचार!!; जयराम रमेश यांनी नव्या संसदेला दिले Modi Multiplex - Modi Marriot नाव!!Jairam Ramesh named the new Parliament Modi Multiplex - Modi Marriot

    याला म्हणतात, मोदींचा फुकट प्रचार!!; जयराम रमेश यांनी नव्या संसदेला दिले Modi Multiplex – Modi Marriot नाव!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या प्रारंभीलाच नव्या संसदेचे कामकाज सुरू झाले. त्यातील पहिले विधेयक 33% महिला आरक्षणाचे आले याची काँग्रेसला झालेली राजकीय जळजळ काही थांबायला तयार नाही, एक तर नवी संसद मोदी सरकारने बांधली. तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. तो उद्घाटनाचा दिवस त्यांनी न बोलता 28 मे सावरकर जयंतीचा निवडला आणि संसदेच्या कामकाजाचा पहिला दिवसही गणेश चतुर्थीचा निवडला. त्यामुळे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले गेले आणि जळजळ अधिक वाढली. Jairam Ramesh named the new Parliament Modi Multiplex – Modi Marriot

    ही वाढलेली जळजळ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांच्या ट्विटर मधून बाहेर आली आहे. जयराम रमेश यांनी नव्या संसदेला Modi Multiplex आणि Modi Marriot ही नावे दिली आहेत. पण यातून मोदींवर टीका होण्याऐवजी मोदींचा फुकटचा प्रचार होतो आहे. कारण नव्या संसदेचे श्रेय मोदींना न मागताच काँग्रेसने देऊन टाकले आहे.

    वास्तविक नवी संसद बांधणे हे काळाच्या दृष्टीने अपरिहार्य होते. केंद्रात मोदी सरकार असते किंवा नसते तरी नवी संसद बांधावीच लागली असती. किंबहुना नव्या संसद बांधकामाचा मूळ प्रस्ताव यूपीए सरकारच्या राजवटीतलाच होता. त्यात थोडा फेरफार करून मोदींनी तो प्रस्ताव प्रत्यक्ष अंमलात आणला. यापेक्षा वेगळे काही त्यांनी केले नाही.



    नव्या संसदेत विशेष अधिवेशनात मंजूर करून घेतलेले 33 % महिला आरक्षणाचे विधेयक मूळात काँग्रेसच्याच राजवटीत तयार झाले होते. पण काँग्रेस राजवटीला ते मंजूर करून घेता आले नव्हते. ते मोदी सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून मंजूर करवून घेतले. याचे खरे श्रेय राजकीय चातुर्य दाखवून काँग्रेसला स्वतःकडे घेत आले असते, पण तसे काँग्रेसने त्यांनी केले नाही. ते फक्त मोदी सरकारवर टीका करत राहिले. त्यामुळे हातात आलेले श्रेय निघून गेले आणि काँग्रेस नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले.

    आता त्यापुढे जाऊन पुन्हा एकदा नव्या संसदेच्या बांधकामाचा विषय काढून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी नव्या संसदेला Modi Multiplex – Modi Marriot अशी नावे ठेवली. मोदी स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी नव्या संसदेचा वापर करतात, असा ट्विटमध्ये आरोप केला. नव्या संसदेत लोकशाहीची हत्या झाली आहे. पंतप्रधानांनी राज्यघटना राज्यघटनेचे फेरलेखन न करता हे घडवून आणले आहे, अशी आरोपांची फैर रमेश यांनी झाडली, पण संसदेला Modi Multiplex – Modi Marriot अशी नावे ठेवून स्वतःहूनच मोदींचा प्रचार फुकट केला.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जयराम रमेश यांच्या या वक्तव्याचे वाभाडे काढले. नवी संसद समस्त भारतवासीयांची आहे. ती मोदी सरकारने बांधली म्हणून काँग्रेसला दुःख होत आहे आणि ती जळजळ रमेश यांच्या ट्विटमधून बाहेर पडते आहे, असे शरसंधान नड्डांनी साधले.

    Jairam Ramesh named the new Parliament Modi Multiplex – Modi Marriot

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य