वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओम – अल्लाह एक आहेत. मनू – आदम एक आहेत. सनातनी हिंदू ओमची पूजा करतात. त्यालाच तर आम्ही अल्लाह म्हणतो, असा दावा करणाऱ्या मौलाना अरशद मदनी यांना जैन आचार्य लोकेश मुनी यांनी शास्त्रचर्चेचे खुले आव्हान दिले आहे, ते देखील त्यांच्याच जमियत उलेमा ए हिंद संस्थेच्या व्यासपीठावरून!! यावेळी हजारोंचा मुस्लिम जनसमुदाय तिथे उपस्थित होता. या जनसमुदायासमोरच आचार्य लोकेश मुनी यांनी अरशद मदनी यांना शास्त्रचर्चेचे खुले आव्हान दिल्याने तो देशभरात जबरदस्त चर्चेचा विषय ठरला आहे. Jain acharya lokesh muni challenges maulana arshad madani over his om – Allah comparison
जमियत उलेमा ए हिंदचे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी पुढाकार घेऊन रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर सर्वधर्मीय संमेलन घेतले होते. या संमेलनात मौलाना अरशद मदनी यांनी सनातन धर्म आणि इस्लामची चर्चा करताना काही उदाहरणे दिली होती. मौलाना अरशद मदनी म्हणाले होते, की मी एका धर्मगुरूंना विचारले की जेव्हा श्रीराम नव्हते, ब्रह्मा नव्हते, शिव नव्हते तेव्हा मनू कुणाची उपासना करत होता??, मला त्या धर्मगुरूंनी उत्तर दिले मनू ओमची उपासना करत होता. मग मी त्यांना म्हटले या ओमलाच तर आम्ही अल्लाह म्हणतो. मनूने ओमची उपासना केली तर आदमने अल्लाहची उपासना केली. ओम आणि अल्लाह एकच आहेत, तर मनू आणि आदम हे देखील एकच आहेत. आदमच्या बायकोला आम्ही हव्वा म्हणतो, तर हिंदू मनूच्या बायकोला हिमावती म्हणतात, अशी कहाणी मौलाना अरशद मदनी यांनी सांगितली होती.
आरशद मदनींच्या या वक्तव्यावर धर्मगुरूंमध्ये आणि देशात प्रचंड खळबळ माजली. मात्र, या संदर्भात अरशद मदनी यांच्याच वक्तव्याची बातमी रविवारी प्रसार माध्यमांनी दिली. त्यामुळे आज जैन आचार्य लोकेश मुनी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. मौलाना अरशद मदनी यांचे भाषण झाल्यानंतर जैन आचार्य लोकेश मुनी यांचे भाषण झाले. त्यावेळी लोकेश मुनी यांनी आरशद मदनींच्या भाषणाची अक्षरशः चिरफाड केली.
लोकेश मुनी म्हणाले, की ओम – अल्लाह एक म्हणून अरशद मदनी यांनी जी कहाणी सांगितली ती पूर्णपणे खोटी आणि फालतू आहे. अशा अनेक कहाण्या मी पण सांगू शकतो. पण पण मी कहाण्या सांगणार नाही. जैन परंपरेतल्या वेगवेगळ्या गोष्टी आजही सनातन धर्मात आहेत. आपण मला कुठेही बोलवा. दिल्लीत बोलवा अथवा मुजफ्फरपुरला बोलवा. मी तुम्हाला खुले आव्हान देतो आपण शास्त्र चर्चा करू या पण आम्ही कोणतेही धर्मगुरू तुमच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे सांगून लोकेश मुनी आणि बाकीच्या धर्मगुरूंनी जमियतचे व्यासपीठ सोडले आणि ते निघून गेले होते.
ही महत्त्वाची बातमी मात्र प्रसार माध्यमांनी त्या दिवशी दिली नव्हती. लोकेश मुनी यांनी आपला व्हिडिओ ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
लोकेश मुनी यांचे शास्त्रचर्चेचे आव्हान अद्याप तरी मौलाना अरशद मदनी यांनी स्वीकारल्याचे दिसत नाही. ते लोकेश मुनींचे आव्हान स्वीकारणार का?? आणि त्यापुढे शास्त्रचर्चा काय होणार??, याची उत्सुकता आता देशभरात लागली आहे.
Jain acharya lokesh muni challenges maulana arshad madani over his om – Allah comparison
महत्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक दावा : तुरुंगातच मिळाली होती ऑफर, ऐकली असती तर खूप आधीच कोसळले असते मविआ सरकार
- पंतप्रधान मोदी आज बंगळुरूत करणार एअरो इंडिया शोचे उद्घाटन : सुपरसॉनिक विमानांचे दिसेल थरारक उड्डाण
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे उद्घाटन : मोदी म्हणाले- सीमेवर रस्ता बांधायला घाबरायची काँग्रेस, त्यांना सैनिकांच्या शौर्यावर संशय होता