• Download App
    जय भीम : आयएमडीबीच्या टॉप २५० चित्रपटांच्या यादीमध्ये 'जय भीम' सिनेमाचा पहिल्या क्रमांकावर | Jai Bhim : Jai Bhim movie tops Imdb ratings list and became the highest rating film ever

    जय भीम : आयएमडीबीच्या टॉप २५० चित्रपटांच्या यादीमध्ये ‘जय भीम’ सिनेमाचा पहिल्या क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: सूर्या, लिजो मोल जोस आणि मनिकंदन यांच्या जय-भीम या चित्रपटाला आयएमडीबी वरील सगळ्यात जास्त रेटिंग मिळाले आहे. 9.6 एवढे रेटिंग मिळून या चित्रपटाने टॉप २५० चित्रपटांच्या यादीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

    Jai Bhim : Jai Bhim movie tops Imdb ratings list and became the highest rating film ever

    ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित झालेल्या या तमिळ चित्रपटाने The Shawshank redemption (9.3), Godfather (9.2), सूर्याचाच चित्रपट सुराराई पोट्रू (9.1) आणि डार्क नाईट (9.0) यासारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

    हा चित्रपट जस्टिस चंद्रू यांच्या संघर्षावर आधारित आहे. जातीयवाद आणि भेदभाव आजही समाजात आहे. आणि पुढेही कदाचित असेल. खोट्या चोरीच्या आरोपाखाली एका आदिवासी जमातीतील व्यक्तीला अटक केली जाते. कायद्याचे रखवाले पोलिसांकडून त्या व्यक्तीचा छळ केला जातो. कारण काय? त्याची जात. हा छळ पुढे जाऊन त्या व्यक्तीचा जीव पोलिसांकडून घेतला जातो. त्याची बायको पार्वती मात्र त्याला न्याय मिळवून देते. ते म्हणतात ना, You Will Not Get Justice, Unless You Make It.


    ‘जय भीम’ या जस्टिस चंद्रू यांच्या मानवी हक्कासाठी दिलेल्या लढाईवर आधारित सिनेमाची सत्यकथा


    जर तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा. जागतिक स्तरावर हा सिनेमा नाव कामावतोय. तसेच या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि वातावरण निर्मिती अगदी उत्तम झाली आहे. जर तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे फॅन असाल आणि समाजात दात विचकत बसलेल्या भेदभाव आणि जातीयवाद पाहून जर रक्त खवळत असेल तर हा सिनेमा तुमचा आहे. सुर्या सारख्या मेन स्ट्रीम कलाकाराने ह्या सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या चित्रपटात काम केले हे नक्कीच सुखद आहे. नक्कीच हा चित्रपट बघण्यासारखा आहे.

    Jai Bhim : Jai Bhim movie tops Imdb ratings list and became the highest rating film ever

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!