• Download App
    दंगली रोखण्यासाठी भाजप मुख्यालय, गृहमंत्र्यांच्या घरावर बुलडोझर चालवा; आपचे खासदार राघव चढ्ढांचे भडकाऊ वक्तव्य!!Jahangirpuri Violence BJP headquarters to prevent riots

    Jahangirpuri Violence : दंगली रोखण्यासाठी भाजप मुख्यालय, गृहमंत्र्यांच्या घरावर बुलडोझर चालवा; आपचे खासदार राघव चढ्ढांचे भडकाऊ वक्तव्य!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रामनवमी, हनुमान जयंती मिरवणूकांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये दंगली घडवल्या. तेथे समाजकंटकांच्या घरांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत प्रशासनाने बुलडोजर चालवले. दिल्लीतल्या जहांगीरपुरी भागातही समाजकंटकांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. ज्या जहांगीरपुरी मध्ये दंगल केली आज त्या भागातच सुमारे दीड तास 9 बुलडोजर चालवून अतिक्रमण हटविण्यात आले. Jahangirpuri Violence BJP headquarters to prevent riots

    मात्र या बुलडोझरच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा प्रचंड संतापले आहेत. दिल्लीसह देशातल्या दंगली थांबवायच्या असतील तर आधी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयावर आणि गृहमंत्र्यांच्या घरावर बुलडोझर चालवा. दंगली आपोआप थांबतील. कारण भाजपचेच लोक राज्याराज्यांमध्ये दंगली घडवून आणतात, असे भडकावू वक्तव्य राघव चढ्ढा यांनी केले आहे.

    दिल्लीतल्या जहांगीरपुरी भागातली दंगल आणि त्यानंतरची अतिक्रमण विरोधी बुलडोजर कारवाई हा संपूर्ण देशभरातल्या चर्चेचा विषय बनला आहे.

    मध्य प्रदेशात खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांच्या घरांवर सरकारने बुलडोजर चालवला. उत्तर प्रदेशात बुलडोजर थांबण्याचे नाव घेत नाही. तेथे गुंड – माफियांच्या घरांवर आणि मालमत्तांवर अव्याहतपणे कायदेशीर बुलडोजर चालत आहे.

    या पार्श्वभूमीवर काही मुस्लीम संघटना बुलडोजर कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या आहेत. मुस्लिम संघटना सुप्रीम कोर्टात जात असतानाच आम आदमी पार्टीने मुसलमानांची बाजू घेत भाजप वर शरसंधान केले आहेत यातूनच रागवू चढ्ढा या राज्यसभा खासदारांनी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयावर आणि गगृहमंत्री अमित शहा यांच्या घरावर बुलडोझर चालविण्याचे भाषा केली आहे. जहांगीरपुरी भागात सकाळी 10.00 वाजता बुलडोजर कारवाई सुरू झाली. 9 बुलडोजर चालले. दीड तासानंतर सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आली म्हणून बुलडोजर कारवाई सध्या थांबली आहे. पण आता राघव चढ्ढा यांच्या भडकाऊ वक्तव्यानंतर या मुद्द्यावर जहांगीरपुरी भागात तसेच दिल्लीतील अन्य भागात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

    Jahangirpuri Violence BJP headquarters to prevent riots

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची