• Download App
    कर्नाटकात 9 महिन्यांत काँग्रेसचे "पॉलिटिकल एबोर्शन"; जगदीश शेट्टर स्वगृही भाजपमध्ये!! Jagdish Shettar back  in BJP

    कर्नाटकात 9 महिन्यांत काँग्रेसचे “पॉलिटिकल एबोर्शन”; जगदीश शेट्टर स्वगृही भाजपमध्ये!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकात सरकार आल्यानंतर काँग्रेसचे 9 महिन्यांत “पॉलिटिकल एबोर्शन” झाले. भाजपमध्ये दीर्घकाळ राहून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस सरकारला कर्नाटक मध्ये मोठा फटका बसला आहे. Jagdish Shettar back  in BJP

    कर्नाटकात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगदीश शेट्टर यांच्यासारख्या ताकदवान लिंगायत नेत्याने भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसच्या दंडात राजकीय बेटकुळ्या आल्या. स्वतः जगदीश शेट्टर काँग्रेसच्या तिकिटावर आपला हुबळी धारवाड मतदारसंघ वाचवू शकले नाहीत, पण भाजपचा कर्नाटकात पराभव झाला होता. लिंगायत मते खेचण्यात काँग्रेस त्यावेळी यशस्वी झाली होती.

    परंतु 9 महिन्यांमध्येच जगदीश शेट्टर यांचे काँग्रेस पक्षात मन विटले. दरम्यानच्या काळात भाजपमध्ये देखील बेरजेच्या राजकारणाविषयी खूप चर्चा झाली. भाजपने कर्नाटक मधले पक्षाचे नेतृत्व बदलले आणि बी. एस. येडीयुरप्पांचे चिरंजीव बी. एस. विजयेंद्र यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले. त्यानंतर विजयेंद्र यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याच्या बळावर जगदीश शेट्टर यांच्या समर्थकांना त्यांना परत पक्षात आणण्यासाठी व्यूहरचना केली. त्याचे फलित म्हणून जगदीश शेट्टर आज भाजपमध्ये परत आले.

    हुबळी धारवाड मधून कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली असताना पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून आपण भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलो होतो. परंतु आता पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान व्हावे, असे वाटल्याने मूळ पक्षात परत आलो, असे वक्तव्य जगदीश शेट्टर यांनी केले. पण त्यामुळे काँग्रेसच्या कर्नाटक मधल्या स्वप्नांना मोठा धक्का बसला. राज्यात काँग्रेसची सत्ता येऊनही काँग्रेसने जगदीश शेट्टर यांना कुठलीही पद दिले नाही अथवा त्यांच्या राजकीय ताकदीचा फायदा करून घेतला नाही. जगदीश शेट्टर यांच्यासारखा माजी मुख्यमंत्री पक्षात आल्यानंतर त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची काँग्रेसला बूज राखता आली नाही.

    त्यामुळे काँग्रेसला कर्नाटक लोकसभा निवडणुकीच्या काळात लिंगायत मते मोठ्या प्रमाणावर गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी भाजपने शेट्टर यांना परत घेऊन लिंगायत मतपेढी भक्कम करून देवेगौडांच्या जेडीएसशी युती करून वक्कलिंग मतेही आपल्या बाजूने वळवून घेतली आहेत.

    Jagdish Shettar back  in BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार