उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून उठलेली राजकीय धूळ अजून काही खाली बसायला तयार नाही. वास्तविक जगदीप धनखड यांचा राजीनामा ही फार मोठी राजकीय घटना घडू द्यायची नाही, असा चंग मोदी सरकार मधल्या सगळ्या वरिष्ठ मंत्र्यांनी बांधला असला तरी प्रसार माध्यमांमुळे आणि सोशल मीडियामुळे धनखड यांचा राजीनामा आणि त्यांच्या भोवतीच्या political stories थांबल्या तर नाहीतच, उलट त्या वाढत गेल्या. या सगळ्यांमध्ये अनेकांनी पतंगबाजी करून घेतली. धनखड यांच्या राजीनाम्याची कारणे पूर्व – पश्चिम – उत्तर – दक्षिण सगळ्या दिशांना धुंडाळून काढली. पण मोदी सरकार मधल्या कुठल्याही वरिष्ठ मंत्र्याने कुठलीही खरी बातमी leak होऊ दिली नाही. त्यामुळे सर्व दिशांना धुंडाळून काढलेली माहिती (बातमी) माध्यमांना जशीच्या तशी बासनात गुंडाळावी लागली. Jagdeep dhankhad
पण त्या पलीकडे जाऊन जगदीप धनखड यांचा मूळ राजकीय स्वभाव आणि त्यांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा यावर कुणीच काही बोलले नाही. ज्या भाजपने आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना 75 % मतांनी उपराष्ट्रपतीपदावर जिंकून आणले होते, त्याच सरकार विरोधात जगदीश धनगड जर काही डावपेच खेळत असतील तर ते सरकार त्यांना त्या खुर्चीवर टिकवून ठेवेल याची शक्यताच नव्हती. अर्थातच जगदीप धनखड यांना बाजूला व्हावे लागले. यामध्ये विरोधकांची बाजू उचलून धरणाऱ्या प्रसार माध्यमांनी मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीची कितीही खिल्ली उडवली तरी उपराष्ट्रपतीपदा सारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या धनखड यांनी विद्यमान सरकारशी राजकीय दृष्ट्या जुळवून घेतले नाही आणि त्याच वेळी सरकार आणि विरोधक यांच्यातला संतुलनाचा तोल सांभाळला नाही ही बाब नजरेआड कशी करून चालेल??, या सवालाचे उत्तर विरोधकांची बाजू उचलून धरणाऱ्या माध्यमांनी दिले नाही.
जगदीप धनकड त्यांच्या मूळ समाजवादी स्वभावाप्रमाणे वागले. त्यांनी मधु लिमये यांच्यासारख्या फूटपाड्या नेत्याला आपले गुरु मानले आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. त्याला इतर कोण काय करणार??
– भैरोसिंह शेखावत यांचे उदाहरण
वास्तविक जगदीप धनखड ज्या उपराष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसले होते, त्या खुर्चीवरून आपल्याच दालनातल्या माजी उपराष्ट्रपतींच्या तसबिरींवर त्यांनी एक नजर जरी टाकली असती, तरी त्यांना उपराष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीने नेमकी कशी वर्तणूक ठेवावी, याची आदर्श उदाहरणे सापडली असती. यापैकी एक उदाहरण त्यांच्या भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून निवडून उपराष्ट्रपती पदावर बसले होते, ते भाजपचे वरिष्ठ नेते भैरोसिंह शेखावत यांचे उदाहरण त्यांना समोरच दिसले असते.
भैरोसिंह शेखावत हे देखील भाजपचे नेते होते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच उपराष्ट्रपती पदावर जाऊन बसले होते पण त्यांच्याविषयी धनगर यांच्यासारखा कुठला प्रकार घडला नव्हता वास्तविक धनखड यांना सलग पाच वर्षे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळातलीच मिळाली होती भैरोसिंह शेखावतयांच्या बाबतीत तसे अजिबात घडले नव्हते. 2002 मध्ये उपराष्ट्रपती झाले आणि 2007 मध्ये सन्मानाने निवृत्त झाले. यातली फक्त दोन वर्षे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारची होती, तर उरलेली तीन वर्षे डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारची होती.
– balanceing act
भैरोसिंह शेखावत यांनी या सर्व कालावधीत आपल्या उपराष्ट्रपती पदाचा आब, रुबाब आणि रुतबा नुसता टिकवून ठेवला नव्हता, तर तो वाढविला देखील होता. वाजपेयी आणि मनमोहन सिंग या परस्पर विरोधी पक्षांच्या पंतप्रधानांबरोबर त्यांचे अतिशय मधुर संबंध राहिले होते. वाजपेयी हे तर त्यांचे बरोबरीचे मित्रच होते, पण मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधान असून देखील भैरोसिंह सिंग शेखावत आणि त्यांच्या उत्तम राजकीय संबंध टिकून राहिले होते. कारण उपराष्ट्रपती पदावर म्हणजेच राज्यसभेच्या अध्यक्षपदावर बसून भैरोसिंह शेखावत यांनी सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात व्यवस्थित संतुलन साधले होते. वाजपेयी सरकार जाऊन मनमोहन सिंग सरकार आले तरीदेखील भैरोसिंह शेखावत यांनी राज्यसभेतले सभापतींचे संतुलित वर्तन ढळू दिले नव्हते. शेखावत यांनी ज्या कौशल्याने राज्यसभा हाताळली आणि सभागृह चालविले, त्या आदर्शानुसार जर जगदीप धनखड यांनी सभागृह चालविले असते, संतुलन ढळू दिले नसते, तर त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली नसती.
पण जे व्हायचे ते घडून गेले आहे. भाजप देखील नव्या भैरोसिंह शेखावत यांच्या शोधात आहे. एकाच वेळी पक्षाशी निष्ठा आणि त्याचवेळी संतुलित राजकीय वर्तन ही कसरत भैरोसिंह शेखावत यांनी अतिशय उत्तम कौशल्याने साध्य केली होती. असे करणारे नेतृत्व भाजपला शोधायचे आहे. मोदी – शाहांच्या भाजपमध्ये असे नेतृत्व मिळेल का??, हा कळीचा सवाल आहे.
Jagdeep dhankhad could have behaved like Bhairon Singh Shekhawat, but he failed
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
- जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांना सत्यपाल मलिकांची झाली आठवण; पण कुणालाही नाही आठवले मधू लिमये!!
- CoinDCX : CoinDCX वर सायबर हल्ला: 380 कोटींची चोरी, क्रिप्टो गुंतवणुकीतील धोक्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
- ED Summons : सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या खटल्यात ईडीचे अपील फेटाळले; सुप्रीम कोर्टाचा सवाल- राजकीय लढायांसाठी ईडीचा वापर का केला जातोय?