वृत्तसंस्था
पुरी : 46 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीमधील भगवान जगन्नाथ मंदिराच्या तळघरातील रत्न भांडाराचे दोन्ही कक्ष रविवारी शुभ वेळी दुपारी १:२८ वाजता उघडण्यात आले. रत्न भांडाराच्या आत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचे ११ सदस्य गेले.समिती सदस्य व मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद पाधी म्हणाले, ‘सर्वप्रथम बाह्य कक्ष उघडले. याच्या तीन चाव्या होत्या. येथे ठेवलेले दागिने व मौल्यवान वस्तू मंदिर परिसरातच बनवण्यात आलेल्या तात्पुरत्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या. रूम आता सील केली आहे. यानंतर अिधकृत सदस्य अंतर्गत कक्षाकडे गेले. तेथे तीन कुलूप लावलेले होते. त्यांच्या मूळ चाव्या गायब होत्या. तथापि, प्रशासनाकडे असलेल्या चावीने एकही कुलूप उघडले नाही. यानंतर दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही कुलूप तोडण्यात आले. आतील अलमाऱ्या व पेट्यांमध्ये दागिने व मौल्यवान वस्तू आढळल्या. मौल्यवान वस्तू स्ट्राँग रूममध्ये घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र तारीख निश्चित केली जाईल, असे सर्व सदस्यांनी ठरवले. सर्व सदस्य सायंकाळी सुमारे ५:२० वाजता रत्न भांडारातून बाहेर आले.’Jagannath Temple Treasures Opened After 46 Years: Jewel Boxes Unlocked
राज्याचे कायदे मंत्री पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले, जगभरातील भगवान जगन्नाथाचे भक्त अनेक वर्षांपासून या क्षणाच्या प्रतीक्षेत होते. भांडारमधील प्रत्येक वस्तूच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी केली जाईल.
पुढे काय
दोन्ही कक्षांची दुरुस्ती करणार एएसआय : सूत्रांनुसार, मौल्यवान वस्तू स्ट्राँग रूममध्ये ठेवल्यानंतर पुरातत्व विभाग (एएसआय) बाह्य आणि अंतर्गत कक्षांची दुरुस्ती करेल. विभागाने दोन्ही कक्षांची तपासणी केली आहे. संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली आहे. तात्पुरच्या स्ट्राँग रूमचीही २४ तास सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली जाईल.
विलंब का
गुंदिचा मंदिरात भगवान, आज परतणार : ७ जुलै रोजी रथ यात्रेनंतर भगवान जगन्नाथ, बलभद्र व देवी सुभद्रा हे गुंदिचा मंदिरात आहेत. ते बहुधा यात्रेद्वारे सोमवारी मुख्य मंदिरात परततील. म्हणून तातडीने मोजणी केली जाणार नाही. खजिना उघडण्यापूर्वी समिती सदस्यांनी गुंदिचा मंदिरात भगवानाकडून परवानगी घेतली.
तळघराच्या दुरुस्तीनंतर मौल्यवान वस्तू तेथेच नेणार, त्यानंतर मोजणी होणार
मुख्य प्रशासक पाधी यांच्या मते, दागिने व मौल्यवान वस्तूंची यादी करण्याचे काम तातडीने सुरू होणार नाही. ते मूल्यांकनकर्ते, सोनार व इतर तज्ज्ञांच्या नियुक्तीनंतर सरकारच्या मंजुरीनंतर केले जाईल. खजिन्याच्या संरचनेची सुरक्षा निश्चित करण्यास आमचे प्राधान्य आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मौल्यवान वस्तू परत आणल्या जातील व त्यानंतर यादी बनवली जाईल. मौल्यवान वस्तू घेऊन जाण्यासाठी लाकडाच्या ६ पेट्या मंदिरात आणल्या आहेत. त्यांच्या आतील भागात पितळेचे आवरण आहे. सागवानाच्या लाकडाच्या या पेट्यांची लांबी ४.५ फूट, उंची २.५ फूट आणि रुंदी २.५ फूट आहे. एका कारागीराच्या मते, मंदिर प्राधिकरणाने १२ जुलैला अशा १५ पेट्या बनवण्याची ऑर्डर दिली होती.
Jagannath Temple Treasures Opened After 46 Years: Jewel Boxes Unlocked
महत्वाच्या बातम्या
- नाव थॉमस मॅथ्यू, वय 20 वर्षे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली!
- आंध्र प्रदेशचे माजी CM जगन रेड्डी यांच्याविरुद्ध FIR; टीडीपी आमदाराचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
- ओवैसींबरोबर “डबल M” कार्ड खेळायला मनोज जरांगे तयार; पण प्रस्ताव – फ्रस्ताव नाही देणार!!
- तामिळनाडू बसपा प्रमुखाच्या हत्येतील आरोपींचे एन्काउंटर; पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना ठार