विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : प्रसादाच्या लाडूतील भेसळीचा वाद अंगावर आला, त्यामुळे जगन मोहन रेड्डींनी राजकीय नौटंकी करत तिरुपतीचा दौराच करून टाकला. Jagan Mohan Reddy Tirupati tour cancle
तिरुपती तिरुमला देवस्थानात प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूच्या तुपामध्ये जनावरांची चरबी आढळली. प्रयोगशाळेत तसे सिद्ध झाले. याचा धक्कादायक खुलासा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी करून हिंदूंच्या भावनांशी सरकारने कसा खेळ केला होता, हे उघड्यावर आणले होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी पूर्ण अडचणीत सापडले. त्यांनी त्यावर वेगवेगळे खुलासे करायचा प्रयत्न केला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना पत्रं लिहिली. परंतु तिरुपतीच्या प्रसादातील लाडूच्या भेसळीचा वाद त्यांच्या अंगावर शेकल्याशिवाय राहिला नाही. भाजपने हा विषय लावून धरला. v
दरम्यानच्या काळात त्यांनी तिरुपतीचा दौरा आखला. मात्र तिरुपती देवस्थानने दर्शनाला येण्यापूर्वी नागरिकांना स्वतःचा धर्म घोषित करावा लागतो, असे कारण देत सर्वसामान्य नागरिकांसाठीच जगन मोहन रेड्डी यांना नोटीस पाठवली. त्यामुळे रेड्डी पूर्ण अडचणीत सापडली कारण जगन मोहन रेड्डी यांचे नाव जरी हिंदू असले, तरी प्रत्यक्षात ते ख्रिश्चन आहेत. त्यांचे वडील राज शेखर रेड्डी हे देखील आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून तिरुपती देवस्थानच्या कमिटीवर त्यांच्या घराण्याचे वर्चस्व राहिले होते. Jagan Mohan Reddy
मात्र, आता आपल्याला तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनाला जायचे असेल तर धर्म जाहीर करावा लागेल हे लक्षात घेऊन जगन मोहन रेड्डी यांनी तिरुपती दौराच करून टाकला. मात्र तो रद्द करताना त्यांनी पुरती राजकीय नौटंकी केली. मी घराच्या चार भिंतींमध्ये बायबल वाचतो. परंतु घराबाहेर पडल्यानंतर मी हिंदू, मुस्लिम, शीख सर्व काही आहे. कारण मी सर्व धर्मांचा आदर करतो. मानवता हा माझा धर्म आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, वगैरे बाता त्यांनी मारल्या. पण प्रसादाच्या लाडूतील भेसळीचा वाद अंगावर आल्यामुळेच जगन मोहन रेड्डींना तिरुपती दौरा रद्द करावा लागला, ही वस्तुस्थिती लपून राहिली नाही. Jagan Mohan Reddy
Jagan Mohan Reddy Tirupati tour cancle
महत्वाच्या बातम्या
- Aadhaar PAN : केंद्र सरकारने आधार, पॅन कार्डची माहिती लीक करणाऱ्या वेबसाइट केल्या ब्लॉक!
- 3 Param Rudra : PM मोदींनी केले 3 ‘परम रुद्र सुपर कॉम्प्युटर’चे उद्घाटन
- Sambhji Raje : मनोजराव, आता कुणाला भेटू नका, विश्रांती घ्या; आठवडाभरात दुसऱ्यांदा भेटून संभाजीराजेंचा सल्ला!!
- Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या प्रश्नांना विकासकामातून उत्तर