विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात जवळपास 50 पेक्षा जास्त नेते कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता दिल्लीतल्या नेत्यांनाही कोरोनाचा विळखा वाढतोय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डाही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. J.P.NADDA: BJP president also corona positive after defense minister! Appeal to people in contact to get tested; tweeted information …
त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
दिल्लीत नेत्यांना कोरोनाचा विळखा
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय, धार्मिक कार्यक्रम आणि कित्येक विवाहसोहळे झाले, त्याला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली असल्याने राज्यात सध्या 50 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित झाल्याची आकडेवारी समोर आली. मंत्रिमंडळातील डझनभर मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही एकापाठोपाठ एक नेते कोरोना पॉझिटिव्ह यायला सुरूवात झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती, तर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
J.P.NADDA: BJP president also corona positive after defense minister! Appeal to people in contact to get tested; tweeted information …
महत्त्वाच्या बातम्या
- रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी
- ममता गोव्यात येऊन राजकीय पायरोवा करू शकतात, पण शिवसेना – राष्ट्रवादी का नाही करू शकत??
- खलिस्थानवाद्यांनी घेतली पंतप्रधानांचा ताफा अडविल्याची जबाबदारी, चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही धमकी
- उत्तर प्रदेशात भाजपच राखणार सत्ता, पंजाबमध्ये आपचा उदय, कॉँग्रेसचा सगळ्याच राज्यांत सुफडासाफ