• Download App
    "याने सत्य बदलणार नाही..." अमित शाहांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनच्या आक्षेपानंतर भारताने स्पष्ट शब्दांत सुनावले!It will n0t change the truth After Chinas objection on Amit Shahs visit to Arunachal India spoke in clear words

    “याने सत्य बदलणार नाही…” अमित शाहांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनच्या आक्षेपानंतर भारताने स्पष्ट शब्दांत सुनावले!

    अमित शाह यांचा अरुणाचल दौरा सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे चीनने म्हटले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याबाबत चीनचे विधान आणि आक्षेप भारताने फेटाळले आहेत. अमित शाह यांचा अरुणाचल दौरा सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे चीनने म्हटले होते.  It will n0t change the truth After Chinas objection on Amit Shahs visit to Arunachal India spoke in clear words

    या प्रदेशाचा दौरा बीजिंगच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनचे हे वक्तव्य फेटाळून लावताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ‘चीनच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेली टिप्पणी आम्ही पूर्णपणे फेटाळून लावतो. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच भारतीय नेते आणि मंत्री नियमितपणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात.”

    परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अशा दौऱ्यांवर आक्षेप घेणे तर्कसंगत नाही. यामुळे वास्तव बदलणार नाही.”

    यापूर्वी अमित शाह यांनी अरुणाचलवरून चीनला प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले की “भारताच्या प्रादेशिक अखंडतेवर” कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. शाह म्हणाले, ‘’आमची एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही.’’ अरुणाचलच्या किबिथू गावात गृहमंत्र्यांनी केंद्राकडून चालवल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा शुभारंभ केला आहे. हे गाव भारत आणि चीनच्या सीमेवर वसलेले आहे.

    It will n0t change the truth After Chinas objection on Amit Shahs visit to Arunachal India spoke in clear words

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे