• Download App
    एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार; मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये । It will be more expensive to withdraw money from ATMs from today; 21 Rs for each transaction above the limit

    एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार; मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार आहे. कारण मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत. It will be more expensive to withdraw money from ATMs from today; 21 Rs for each transaction above the limit

    रिझर्व्ह बँकेने या बाबतची कल्पना ग्राहकांना जून महिन्यात दिली होती. ग्राहकांना १ जानेवारी २०२२ पासून मोफत परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये शुल्क म्हणून द्यावे लागतील. सध्या बँकांना एटीएममधून अशा व्यवहारांसाठी २० रुपये आकारण्याची परवानगी आहे. ग्राहक दरमहा पाच विनामूल्य व्यवहारांसाठी पात्र आहेत. ते मेट्रो केंद्रांमधील इतर बँकेच्या एटीएममधून तीन आणि मेट्रो नसलेल्या केंद्रांमध्ये पाच विनामूल्य व्यवहारांसाठी देखील पात्र आहेत.



    आरबीआयने बँकांना १ऑगस्ट २०२१पासून सर्व केंद्रांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहाराचे इंटरचेंज शुल्क १५ वरून १७ रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ५ वरून ६ रुपये करण्याची परवानगी दिली होती. एटीएमचा वाढता खर्च आणि बँका/व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सकडून एटीएम देखभालीसाठी होणारा खर्च, तसेच भागधारकच्या अपेक्षा आणि ग्राहकांच्या सोयी यांचा समतोल साधण्याची गरज लक्षात घेऊन शुल्क वाढवले आहे.

    It will be more expensive to withdraw money from ATMs from today; 21 Rs for each transaction above the limit

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही