• Download App
    मोपल्यांचे स्वातंत्र्ययुद्ध नव्हते, तो जिहादमधून केलेला हिंदू नरसंहारच होता; योगी आदित्यनाथ यांचे परखड प्रतिपादनIt was not the war of independence of Mopals, it was the Hindu genocide committed through jihad; Yogi Adityanath's eloquent statement

    मोपल्यांचे स्वातंत्र्ययुद्ध नव्हते, तो जिहादमधून केलेला हिंदू नरसंहारच होता; योगी आदित्यनाथ यांचे परखड प्रतिपादन

    मोपल्यांनी केलेल्या नरसंहराला शंभर वर्षे पूर्ण झाली. या विषयी जनजागृती करण्यासाठी पांचजन्य नियतकालिकाने ऑनलाइन परिसंवाद घेतला. त्यात ते बोलत होते. खिलाफत आंदोलनात त्यावेळच्या मुसलमानांना अपयश आले. It was not the war of independence of Mopals, it was the Hindu genocide committed through jihad; Yogi Adityanath’s eloquent statement


    वृत्तसंस्था

    लखनौ : मलबारमध्ये सन 1921 मध्ये झालेले मोपल्यांचे बंड हे स्वातंत्र्ययुद्ध वगैरे काही नव्हते, तो हिंदूंविरुद्धचा जिहादच होता आणि त्यातून मोपल्यांनी हजारो हिंदूंचा नरसंहार केला, असे परखड प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

    मोपल्यांनी केलेल्या नरसंहराला शंभर वर्षे पूर्ण झाली. या विषयी जनजागृती करण्यासाठी पांचजन्य नियतकालिकाने ऑनलाइन परिसंवाद घेतला. त्यात ते बोलत होते. खिलाफत आंदोलनात त्यावेळच्या मुसलमानांना अपयश आले. त्यातून चिडून जाऊन त्यांनी हिंदूविरुद्ध जिहाद पुकारला.



    परंतु त्यावेळच्या इतिहासकारांनी आणि स्वातंत्र्यानंतरच्या देखील डाव्या विचारसरणीचा इतिहासकारांनी या जिहादला स्वातंत्र्य युद्धाचे रूप दिले. मुसलमान मजुरांनी हिंदू जमीनदारांनी विरुद्ध पुकारलेले बँड म्हटले. परंतु जर ते फक्त जमीनदारी विरुद्धचे बंड असते तर हजारो सर्वसामान्य हिंदूंची हत्या का केली गेली?, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला.

    प्रत्यक्षात ते बंड वगैरे काही नव्हते तो मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात पुकारलेला जिहादच होता. त्यांनी हजारो हिंदूंचा नरसंहार केला यातले सत्य प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडले. त्यांनी “मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे?” या कादंबरीतून हिंदू समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

    घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मोपल्यांच्या बंडला हिंदू विरुद्ध पुकारलेला जिहाद असेच नाव दिले. मोपल्त्यांनी दाखवताना आंदोलन ब्रिटिशांविरुद्ध दाखवले पण प्रत्यक्षात हिंदूंचा नरसंहार केला, असे डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटले आहे, याकडे योगी आदित्यनाथ यांनी आवर्जून लक्ष वेधले.

    It was not the war of independence of Mopals, it was the Hindu genocide committed through jihad; Yogi Adityanath’s eloquent statement

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य