• Download App
    नोटांवर लक्ष्मी गणेश : केजरीवालांच्या माजी सहकाऱ्यांनीच त्यांना केले एक्सपोज It was Kejriwal's former colleagues who exposed him

    नोटांवर लक्ष्मी गणेश : केजरीवालांच्या माजी सहकाऱ्यांनीच त्यांना केले एक्सपोज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच लक्ष्मी गणेशांच्याही प्रतिमा असाव्यात, अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर भाजप काँग्रेस सारख्या पक्षांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या भाषेत टीकास्त्र सोडले आहे. पण अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी कुमार विश्वास, आशुतोष आणि प्रशांत भूषण यांनी त्यांना वेगळ्या पद्धतीने एक्सपोज केले आहे. It was Kejriwal’s former colleagues who exposed him

    कुमार विश्वास यांनी त्यांना अरविंद केजरीवालांना शतकातला सगळ्यात  मोठा धूर्त आणि घातक राजकारणी असे बिरुद लावले आहे, तर आशुतोष यांनी केजरीवाल यांची सूचना गांभीर्याने घ्यायचीच गरज नाही. कारण त्या अशाच कोलांटीउड्या मारत असतात, असे शरसंधान साधले आहे. त्यांचा कुहेतू जनतेसमोर वारंवार येत राहिला आहे, याची आठवण आशुतोष यांनी करून दिली आहे, तर प्रशांत भूषण यांनी केजरीवालांच्या सूचनेला भाजपच्या हिंदुत्वावर हल्ला असे म्हटले आहे.

    कुमार विश्वास यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून अरविंद केजरीवाल यांच्या सूचने मागचे राजकीय इंगित स्पष्ट केले आहे. कुमार विश्वास म्हणतात, अरविंद केजरीवालांना हे पक्के माहिती आहे की अल्पसंख्यांक मतांमध्ये अखिलेश यादव, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी हे मोठे वाटेकरी आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीला अल्पसंख्यांकांची संपूर्ण मते मिळू शकत नाहीत. अशावेळी 82 % हिंदू वोट बँकेवर धार्मिक पद्धतीने हल्ला चढवला की त्यातला काही वाटा आपोआपच आम आदमी पार्टीला मिळेल, असा शतकातल्या सगळ्यात मोठ्या धूर्त राजकारण्याचा राजकीय होरा आहे आणि हिंदू व्होट बँकेतली काही मते मिळवली की उरलेली अल्पसंख्यांकांची मते देखील मोदी द्वेषामुळे आम आदमी पार्टीकडेच वळतील, असे या धूर्त राजकारण्याला वाटते. त्यामुळेच त्याने लक्ष्मी गणेशा विषयी प्रेम दाखवले आहे.

    भाजपच्या हिंदुत्वावर हल्लाबोल करण्यासाठीच अरविंद केजरीवालांनी तशी सूचना केली, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. एकूण अरविंद केजरीवालांच्या सूचनेमुळे धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये देखील वेगळ्या प्रकारचे ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येत आहे.

    It was Kejriwal’s former colleagues who exposed him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!