• Download App
    रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सचा गणवेश बदलला ! साधूंच्या आक्षेपानंतर IRCTC चा तत्काळ निर्णय...It is to inform that the dress of service staff is completely changed in the look of professional attire of service staff.

    Ramayana Train : रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सचा गणवेश बदलला ! साधूंच्या आक्षेपानंतर IRCTC चा तत्काळ निर्णय…

    IRCTC ने सोमवारी संध्याकाळी ट्विट करुन याची माहिती दिली आणि नवीन ड्रेससह वेटर्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सना भगवा पोशाख देण्यात आला होता.या कारणावरुन सुरू झालेला वाद आता संपुष्टात आला आहे. उज्जैनच्या संतांच्या आक्षेपानंतर आयआरसीटीसीने रामायण एक्स्प्रेसमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या ड्रेसमध्ये बदल केला आहे.It is to inform that the dress of service staff is completely changed in the look of professional attire of service staff.

     

    अयोध्या-रामेश्वरम ट्रेनमध्ये भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा भांडी उचलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उज्जैनच्या संत समाजाने हा संतांचा अपमान असल्याचे म्हणत त्यावर आक्षेप घेतला होता.

    त्यावर रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले, उज्जैनमध्ये राहणाऱ्या उज्जैन आखाडा परिषदेनेही रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदवला होता.  यानंतर आयआरसीटीसीने सोमवारी संध्याकाळी रामायण एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काम करणाऱ्या वेटर्सचा गणवेश बदलला आहे. आयआरसीटीसीने ट्विट करून ही माहिती दिली – ‘रेल्वे कर्मचार्‍यांचा पोशाख व्यावसायिक गणवेशात बदलण्यात आला आहे.’

    अयोध्या, चित्रकूटसह भगवान श्री राम यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी भारतीय रेल्वेने IRCTC च्या माध्यमातून रामायण एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे.

    It is to inform that the dress of service staff is completely changed in the look of professional attire of service staff.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!