वृत्तसंस्था
बेंगळुरू – पक्षांतर केले उत्तर प्रदेशातल्या जितीन प्रसादांनी. तिथे काही हालचाली नाही झाल्या. पण त्यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया आली कर्नाटकातून काँग्रेसने अशी राष्ट्रीय एकात्मता साधली आहे. It is the Congress party and the Nehru family that gave him recognition. He should not forget it and I also should not forget it
काँग्रेसचे ४७ वर्षांचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी आज सकाळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ज्या पक्षात राहून जनतेचे आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे हित साधता येत नाही, त्या पक्षात राहून साध्य काय होणार?, असा सवाल त्यांनी पक्षांतर करताना उपस्थित केला होता. त्यांचे स्वागत काँग्रेसचे माजी नेते आणि सध्याचे भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील केले.
पण ज्या उत्तर प्रदेशाच्या धौरहरामधून जितीन प्रसाद खासदार झाले होते, त्या जिल्हा काँग्रेसमधून किंवा उत्तर प्रदेश काँग्रेसमधून त्यांच्या पक्षांतरावर कोणती प्रतिक्रियाच आली नाही.
जितीन प्रसादांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया आली ती उत्तर प्रदेशापासून दूर असलेल्या कर्नाटकातून. काँग्रेसचे कर्नाटकातले संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांनी जितीन प्रसाद यांच्या पक्षांतरावर टीका केली आहे. ते म्हणाले, की जितीन प्रसादांनी हे विसरू नये, की त्यांना राजकीय प्रतिष्ठा आणि स्थान काँग्रेस पक्षाने आणि नेहरू परिवाराने मिळवून दिले आहे. हे मी देखील कधी विसरणार नाही.
जितीन प्रसाद यांच्या पक्षांतरावर उत्तर प्रदेशातून नव्हे, तर कर्नाटकातून प्रतिक्रिया आल्याने काँग्रेसमध्ये आगळी “राष्ट्रीय एकात्मता” साधली गेल्याची चर्चा आहे.
It is the Congress party and the Nehru family that gave him recognition. He should not forget it and I also should not forget it
महत्त्वाच्या बातम्या
- पन्नास दिवसांत 53 हजार कोरोना रुग्ण बरे; पुण्यात रुग्णांच्या संख्येमध्ये विक्रमी घट
- दिल्लीतल्या सत्तेचा सारीपाट उलगडून दाखविणारा दूवा निखळला; नरसिंह रावांचे विश्वासू सचिव राम खांडेकर यांचे निधन
- Accident! उत्तर प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात ;१७ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची तत्काळ मदत जाहीर
- Corona Vaccination : घराजवळ नक्कीच लसीकरण करू ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण