विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून सत्ता मिळवली असली तरी त्यात मुख्यमंत्रीपदाचे एक सोडून चार दावेदार तयार झाले आहेत. It is the BJP, whose commitment to Ideology never weakens even if it faces routs in any election.
या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील भाजपच्या पराभवासंदर्भातील वस्तुस्थिती नीट तपासली तर भाजपचा पराभव विधानसभेतील आमदारांच्या आकड्यांमध्ये झाला असला तरी प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीत भाजप आपला आधीचा आकडा ओलांडू शकला नाही, एवढाच पराभव मर्यादित आहे.
पराभवाला चंदेरी किनार
- पण तरी देखील भाजपच्या या पराभवाला एक वेगळी चंदेरी किनार लाभली आहे, ती म्हणजे कोणत्याही पराभवाचे खापर भाजपने ईव्हीएम किंवा जनतेवर फोडलेले नाही. भाजपच्या पराभवाने लोकशाही धोक्यात आलेली नाही. त्या उलट जनमताचा कौल मान्य करून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
- भाजपची आयडियालॉजिकल कमिटमेंट कधीच कमजोर पडत नाही. कोणत्याही निवडणुकीत विजय किंवा पराभवाने त्यात फरक पडत नाही. उलट पराभवातून धडा शिकून पुढच्या निवडणुकीसाठी आपल्या उणिवा दूर करण्याचा भाजप नेते आणि कार्यकर्ते प्रयत्न करतात.
- भाजपचे सर्वात मोठे नेते आघाडीवर राहून निवडणुकीत नेतृत्व करतात. त्यात पक्षाचा पराभव अथवा विजय याचा विचार करत नाहीत, तर आपलीच संपूर्ण ताकद झोकून देऊन पक्षासाठी प्रचार करतात. विजयी हारांसाठी माना पुढे आणि पराभवाच्या जबाबदारीत हात मागे असला प्रकार भाजपमध्ये नाही.
- कोणत्याही निवडणुकीत विजय होवो अथवा पराभव, प्रत्येक निवडणूक स्वतंत्र आहे. त्यामुळे त्या प्रत्येक निवडणुकीची तयारी स्वतंत्रपणे करायची आहे हेच भाजपच्या वरपासून खालपर्यंत नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आग्रही मत आहे आणि त्यानुसारच त्यांचे काम सुरू झाले आहे. यातच भाजप आणि इतर पक्षांच्या तत्त्वज्ञानात आणि कार्यवाही मध्ये फरक आहे.
It is the BJP, whose commitment to Ideology never weakens even if it faces routs in any election.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??