• Download App
    पीएफमधून आता कर्ज घेणेही शक्य, कोणत्याही हमीची गरज नाही It is now possible to take a loan from PF, no guarantee is required

    पीएफमधून आता कर्ज घेणेही शक्य, कोणत्याही हमीची गरज नाही

    कोरोना संकटात जर आपण आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर आपल्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर कर्ज घेणे सहजशक्य होणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या हमीची गरज नाही. यात आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकता. It is now possible to take a loan from PF, no guarantee is required


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोना संकटात जर आपण आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर आपल्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर कर्ज घेणे सहजशक्य होणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या हमीची गरज नाही. यात आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकता.

    पीएफखात्यात गुंतवणुकीची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच कर्ज उपलब्ध होईल. सामान्यत: पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो, पण एकदा हे खाते 5 वर्षांचे झाल्यावर त्यातून कर्ज घेता येऊ शकेल. मॅच्युरिटीपूर्व पैसे काढण्याचा देखील फायदा घेता येऊ शकेल.

    पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्याच्या मुदतीच्या व्यतिरिक्त ठेवीची रक्कमही महत्त्वाची असते. ठेवीच्या रकमेवर तुम्ही 25 टक्के कर्ज मिळू शकते. त्यासाठी प्रथम कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड करावी लागणार आहे.



    जर खातेदारकाचे पीपीएफ खाते निष्क्रिय केले गेले असेल, तर त्यावर कर्ज घेऊ शकत नाही. याशिवाय पीपीएफवर आधी कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जाजी परतफेड झाल्याशिवाय ी आणखी कर्ज मिळणार नाही.

    कजार्ची मूळ रक्कम भरण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी दिला जातो. ही मुदत ज्या महिन्यात कर्ज घेतले, त्या महिन्यापासून सुरू होते. पीपीएफवर मिळणाºया व्याजापेक्षा कर्जावरील व्याजदर फक्त 1% जास्त आहे. कजार्ची मूलभूत रक्कम निश्चित वेळेत भरली असेल, परंतु व्याजाचा काही भाग शिल्लक असेल तर तो पीपीएफ खात्यातून वजा केला जाईल.

    जर वेळेवर कर्ज परत करण्यास सक्षम नसाल तर उर्वरित कर्जाची रक्कम वार्षिक सहा टक्के दराने आकारली जाईल. हा सहा टक्के व्याजदर ज्या महिन्यात कर्ज घेतला आहे त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटचा हप्ता भरेपर्यंत लागू असेल. या कालावधीत खातेदार मृत्युमुखी पडल्यास नामनिर्देशित व्यक्ती किंवा उत्तराधिकाºयाला त्याचे व्याज भरावे लागेल.

    It is now possible to take a loan from PF, no guarantee is required

    इतर  बातम्या 

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी