Thursday, 8 May 2025
  • Download App
    Anna Hazare आरोप झाल्यावर मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही

    Anna Hazare : आरोप झाल्यावर मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही, मुंडे, कोकाटेंच्या वादानंतर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया

    Anna Hazare

    Anna Hazare

    प्रतिनिधी

    अहिल्यानगर : Anna Hazare  ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा त्यांचा दोष आहे. मंत्र्यांचे आचरण, विचार शुद्ध असायला हवेत. जीवन निष्कलंक हवे. अपमान सहन करण्याची शक्ती असेल तरच जनता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे अनुकरण करील,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वीच विचार होणे आवश्यक होते, अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या प्रमुखांचे कानही टोचले.Anna Hazare



    अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिली. पण त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. हजारे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवला पाहिजे. समाजाचे नेतृत्व करणारे मंत्रीच जर वाट सोडून चालले तर जनता, राज्य आणि देशाचे मोठे नुकसान होईल. याचा चुकीचे काम करणाऱ्या मंत्र्यांनी विचार करायला हवा, असे हजारे म्हणाले.

    It is not right for ministers to remain in office after being accused, Anna Hazare’s reaction after the Munde, Kokate controversy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी