• Download App
    अ‍ॅमेझॉन नाही ही तर गांजा कंपनी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आरोप|It is not Amazon but the ganja company, the Confederation of All India Traders

    अ‍ॅमेझॉन नाही ही तर गांजा कंपनी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ती कंपनी आता अ‍ॅमेझॉनऐवजी ‘गांजा कंपनी’ म्हणून ओळखली जावी. आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांपेक्षा गंभीर काम अ‍ॅमेझॉनने केले, त्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे.It is not Amazon but the ganja company, the Confederation of All India Traders

    मध्य प्रदेशातील भिंड जिल्हा पोलिसांनी शनिवारी आॅनलाइन गांजा विक्री रॅकेटचा पदार्फाश केल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे गोड पदार्थ (स्वीटनर) विकण्याच्या नावाखाली गांजाची विक्री केली जात होती.



    अ‍ॅमेझॉनने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीर उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी देत नाही आणि या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, देशात एएसएसएल म्हणून काम करणाऱ्याऱ्या अ‍ॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या कलम ३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने या गंभीर प्रकरणी केंद्र सरकारकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आणि अ‍ॅमेझॉनने विक्रेत्याचे काम केल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केली. आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांपेक्षा गंभीर काम अ‍ॅमेझॉनने केले,

    त्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सीएआयटीने केली आहे. खंडेलवाल यांनी एनसीबीसह सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना या बेकायदेशीर कृत्यासाठी तात्काळ कारवाई करावी आणि अ‍ॅमेझॉनच्या उच्च व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. जर ते त्यांच्या पोर्टलवरून गांजा विकता असतील, तर ते उद्या शस्त्रांची बेकायदेशीर विक्री किंवा मनी लाँड्रिंगचा व्यापारही त्यांच्या पोर्टलवरून चालवतील.

    It is not Amazon but the ganja company, the Confederation of All India Traders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली