वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे देखील आमंत्रण दिले आहे. याबद्दल भारतातील ख्रिश्चन धर्मगुरूंनी आनंद व्यक्त केला आहे.It is great news not just for Christians but for every Indian. We wanted the Pope to visit India
पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीमुळे भारतातील ख्रिश्चन समाजाला आनंद झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंधांवर या भेटीचा सकारात्मक परिणाम होईलच, परंतु देशांतर्गत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांची भेट अधिक उपयुक्त ठरेल, असा आत्मविश्वास दिल्ली कॅथोलिक आर्कङॉक्सीसचे प्रवक्ते फादर एस. शंकर यांनी व्यक्त केला आहे.
त्याच वेळी ओरिसातील सर्व चर्चचे प्रमुख आणि कटक – भुवनेश्वरचे आर्चबिशप जॉर्ज बार्वा यांनी देखील मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीविषयी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिल्याने भारतातल्या सामाजिक संवादामध्ये भर पडेल असा विश्वास जॉन बार्वा यांनी व्यक्त केला आहे.
केरळ मधला ख्रिश्चन समुदाय सध्या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून अस्वस्थ आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन समुदायाच्या धर्मगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर जो आशावाद व्यक्त केला आहे त्याला विशेष महत्त्व आहे.
It is great news not just for Christians but for every Indian. We wanted the Pope to visit India
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे