• Download App
    समाजवादी पक्षाला पराभव पचविणे अवघड, एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने केले विषप्राशन|It is difficult for the Samajwadi Party to digest defeat, One himself set on fire and the other was poisoned

    समाजवादी पक्षाला पराभव पचविणे अवघड, एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने केले विषप्राशन

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील पराभव स्वीकारणे समाजवादी पक्षाच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अवघड झाले आहे. निवडणुकीतला पराभव जिव्हारी लागल्याने विधान भवनाच्या जवळच स्वत:ला पेटवून घेतले. एका कार्यकर्त्याने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.It is difficult for the Samajwadi Party to digest defeat, One himself set on fire and the other was poisoned

    समाजवादी पक्षाचे कानपूरचे उपाध्यक्ष नरेंद्र सिंह उर्फ ‘पिंटू’ यांनी लखनौ येथे विधान भवनाबाहेर स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नरेंद्र सिंह 30 टक्के भाजले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.



    लखनऊजवळील चिनहट येथील एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी सायंकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित तरुणानं विषारी औषध प्राशन केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.

    याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. विजय यादव उर्फ नरेंद्र असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नरेंद्र याची विभूतीखंड येथील अवध बसस्थानकाशेजारी चहाची टपरी आहे. पण मागील काही दिवसांपासून त्यानं आपली चहाची टपरी बंद ठेवली होती.

    दरम्यान, नरेंद्र यानं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. ज्यामध्ये त्यानं म्हटलं होतं की, 2022 मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन झालं नाही, तर मी विष प्राशन करून आत्महत्या करणार आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गुरुवारी सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्रला अपेक्षित असणारं सपाचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे नरेंद्र यानं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटल्यानुसार विषारी औषध प्राशन केले.

    It is difficult for the Samajwadi Party to digest defeat, One himself set on fire and the other was poisoned

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य