• Download App
    शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास भाजपचे सत्तेत येणे कठीण : मेघालय राज्यपाल सत्यपाल मलिक | It is difficult for BJP to come to power if farmers' demands are not met: Meghalaya Governor Satyapal Malik

    शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास भाजपचे सत्तेत येणे कठीण : मेघालय राज्यपाल सत्यपाल मलिक

    विशेष प्रतिनिधी

    राजस्थान : सत्यपाल मलिक हे मेघालय राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते याआधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहायचे. राजस्थानमधील झुझुनू जिल्ह्यामधील एका कार्यक्रमावेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक सणसणीत विधान केले आहे. ते म्हणतात की, जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही. पुढे ते म्हणतात की, मी स्वतः मेरठचा आहे. सरकारच्या शेतकऱ्यां विषयीच्या धोरणामुळे माझ्या भागात भाजपचा कोणताही नेता प्रवेश करु शकत नाही. ना मेरठमध्ये, ना मुजफ्फरनगरमध्ये, ना बागपतमध्ये ते प्रवेश करू शकतात.

    It is difficult for BJP to come to power if farmers’ demands are not met: Meghalaya Governor Satyapal Malik

    यावेळी पत्रकारांनी मलिक यांना शेतकर्यांसाठी उभे राहण्यासाठी आपले पद सोडणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी शेतकर्यांच्या पाठीशी नेहमीच उभा आहे. आजपर्यंत अशी वेळ आली नाही की मला माझे पद सोडावे लागेल. पण गरज तशी असेल तर मी नक्कीच माझे पद सोडेन. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वांसोबत भांडलो आहे. जर सरकारने कायदेशीररीत्या एमएसपीची हमी दिली तर हे आंदाेलन संपू शकते. शेतकरी तीन कायदे रद्द करण्याचे सोडू शकतात कारण सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगित केले आहेत. आता फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे एमएसपी हमीची. तुम्ही ते का करत नाही? असा प्रश्न त्यांनी सरकारला यावेळी विचारला आहे.


    काश्मिरातील टार्गेट किलिंगवर सत्यपाल मलिक यांचा संताप, म्हणाले, “मी राज्यपाल असताना अतिरेक्यांची हिंमत नव्हती!”


    याआधी शरद पवार यांनी देखील पंजाबमधील शेतकर्यांच्या भावनांसोबत खेळू नका. नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी शक्यता सरकार समोर मांडली होती. देशाच्या अन्नधान्य पुरवठा मध्ये आणि संरक्षणमध्ये पंजाबच्या शेतकर्यांचा आणि लोकांचा खूप मोठा सहभाग असतो. तेथील लोकांना दुखावून चालणार नाही. असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले होते.

    मागील जवळपास आठ महिन्यांपासून सुरु असणार्या शेतकरी आंदोलनावर सरकार अजून कोणताही तोडगा काढताना दिसून येत नाहीये. त्यामुळेच शेतकऱ्यांचे भविष्य काय हा प्रश्न आहे तसाच राहिला आहे.

    It is difficult for BJP to come to power if farmers’ demands are not met: Meghalaya Governor Satyapal Malik

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!