विशेष प्रतिनिधी
दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. याच वेळी समाजवादी पक्षाचे हसन यांनी एएनआय सोबत बोलताना म्हटले आहे की, महिलांच्या प्रजनन क्षमतेचे वय 16-17 वर्ष ते 30 वर्ष इतके असते. मुलींना लग्नाचे प्रस्ताव येण्यास वय वर्षे 16 पासून सुरुवात होते. त्यामुळे या काळात मुलींनी लग्न करणे अतिशय योग्य असते.
It is best for girls to marry at the age of fertility; Samajwadi Party leader Hassan
लग्नाला उशीर झाला तर त्याचे अनेक तोटे सांगताना ते म्हणतात की, एक म्हणजे वृद्धत्व. जर तुम्ही वयोवृध्द झाला आणि तुमची मुले अजून सेटल झाली नसतील, अजूनही विद्यार्थी असतील तर एक वेगळी काळजी राहते आणि दुसरे म्हणजे, लग्नाला उशीर झाला तर मुले होण्याची शक्यता कमी असते.
पुढे ते म्हणतात की, 16 व्या वर्षी जवळपास सर्व मुली या वयामध्ये येतात. 18 व्या वर्षी मतदान करु शकतात तर 18 व्या वर्षी लग्न का करु शकत नाहीत?
It is best for girls to marry at the age of fertility; Samajwadi Party leader Hassan
महत्त्वाच्या बातम्या
- द फॅमिली मॅन 2 फेम अभिनेत्री समानथाचे बॉलीवूड पदार्पण
- विकीसाठी कोणता पदार्थ बनवला कॅटरिनाने?
- Asian Champions Trophy : हॉकीत भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय; ३-१ ने मात, उपांत्यफेरीमध्ये दमदार प्रवेश
- CONGRESS CONTROVERSY : संतापजनक!कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश कुमार सभागृहात म्हणाले -‘बलात्काराचा आनंद घ्या’;सभापतीही हसले ; कॉंग्रेसच्या महिला नेत्या संतापल्या
- आक्रितच, उत्तर कोरियातील नागरिकांना अकरा दिवस हसण्यास बंदी