Tuesday, 6 May 2025
  • Download App
    इस्रोचे छोट्या रॉकेटने प्रक्षेपण अपयशी : दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत गेले, चौकशी समिती स्थापन|ISRO's small rocket launch failure: Both satellites went into wrong orbit, inquiry committee formed

    इस्रोचे छोट्या रॉकेटने प्रक्षेपण अपयशी : दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत गेले, चौकशी समिती स्थापन

    वृत्तसंस्था

    श्रीहरिकोटा : रविवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) दोन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण अयशस्वी झाले. दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत गेल्याचे इस्रोने म्हटले आहे. आता त्यांचा काही उपयोग नाही. इस्रोने उपग्रहांच्या अपयशाची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे.ISRO’s small rocket launch failure: Both satellites went into wrong orbit, inquiry committee formed

    इस्रोने रविवारी सकाळी ९.१८ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून आपले पहिले नवीन रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) D1 प्रक्षेपित केले. या रॉकेटद्वारे आझादीसॅट उपग्रह पाठवण्यात आले. त्याचे 75 पेलोड देशभरातील 75 ग्रामीण सरकारी शाळांमधील 750 विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. श्रीहरिकोटा येथे लाँचिंगच्या वेळी डिझाइनिंग करणाऱ्या मुलीही उपस्थित होत्या.



    रॉकेटने दोन्ही उपग्रह अवकाशात नेले. मात्र त्यानंतर उपग्रहांकडून डेटा येणे थांबले. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. EOS02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे, ज्याने अंतराळात 10 महिने काम केले असते. त्याचे वजन 142 किलो आहे. यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे. त्याचे रिझोल्यूशन 6 मीटर आहे. हे रात्रीदेखील निरीक्षण करू शकते.

    आझादीसॅट हा विद्यार्थ्यांचा उपग्रहही पाठवण्यात आला

    आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त SpaceKidz इंडियाचा विद्यार्थी उपग्रह AzadiSat देखील पाठवण्यात आला आहे. आझादीसॅट हा सह-प्रवासी उपग्रह आहे. सेंट फ्रान्सिस गर्ल्स हायस्कूल, तेलंगणाची विद्यार्थिनी श्रेया म्हणाली– आमच्या शाळेतील तीन गट या SSLV लाँचमध्ये सहभागी झाले आहेत. आम्हाला ही संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज आम्ही आझादीसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण पाहिले.

    ISRO’s small rocket launch failure: Both satellites went into wrong orbit, inquiry committee formed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Manipur : मणिपूरमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल; उग्रवादी संघटनांच्या ११ सदस्यांना अटक

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

    Gujarat : गुजरातमध्ये पावसाने केला कहर, १४ जणांचा मृत्यू १६ जण जखमी