- हा प्रयोग भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी मोठे यश मानले जात आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संस्था इस्रोने चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवून एक मोठे यश मिळवले होते. त्यानंतर आता चांद्रयान-3 च्या प्रयोगात इस्रोला आणखी एक यश मिळाले आहे. हा प्रयोग भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी मोठे यश मानले जात आहे. ज्या अंतर्गत ISRO ने चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत बोलावले आहे. चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल (पीएम) चंद्राभोवती सतत फिरत होते.ISRO got another big success Chandrayaan 3 this device returned to Earths orbit from the Moon
इस्रोचा हा प्रयोग येत्या काळात चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रोपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यासाठी यास रिटर्न मॅन्यूअर केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रोपल्शन मॉड्यूलने 10 नोव्हेंबर रोजी चंद्रावरून पृथ्वीच्या कक्षेत परतण्याचा प्रवास सुरू केला. 22 नोव्हेंबर रोजी, प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला बिंदू पेरिगी जवळून गेले.
चांद्रयान-3 ला निरोप देणारा आवाज झाला शांत, इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
चंद्रावरून नमुने परत आणण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इस्रोने हा प्रयोग केला आहे. याबाबत इस्रोने सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमची हॉप चाचणी ज्याप्रकारे करण्यात आली, हा प्रयोग देखील त्याच स्वरूपाचा अनोखा प्रयोग आहे. चांद्रयान-3 चा प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या 150 किमीच्या कक्षेत फिरत होता, जो आता पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे.
ISRO got another big success Chandrayaan 3 this device returned to Earths orbit from the Moon
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…