• Download App
    इस्रायल मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापनेचा निर्णय सर्व विरोधी पक्षांची सरकारला वॉर कॅबिनेट मध्ये साथ!! Israel-Palestine war : ‘Hostile aircraft’ enters Israel from Lebanon

    Israel-Palestine war : इस्रायल मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापनेचा निर्णय सर्व विरोधी पक्षांची सरकारला वॉर कॅबिनेट मध्ये साथ!!

    वृत्तसंस्था

    तेल अविव : आता कोणत्याही स्थितीत हमास दहशतवादी संघटनेचा खात्मा करायचाच या जिद्दीने पेटलेल्या इस्रायलमध्ये प्रखर राष्ट्रीय भावना चेतली असून पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि विरोधी पक्षनेते बेनी गेट्स यांनी एकत्र येऊन इस्रायल मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बेनी गेट्स हे इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री आहेत. त्यांच्या पुढाकारातून वॉर कॅबिनेटमध्ये इस्रायल मधल्या सर्व पक्षांचे प्रतिनिधी सरकारला साथ द्यायला तयार झाले आहेत. Israel-Palestine war : ‘Hostile aircraft’ enters Israel from Lebanon

    अमेरिकेसह भारतासारख्या बळकट राष्ट्रांनी इस्रायलची पाठराखण केल्यामुळे इस्रायलच्या राष्ट्रीय भावनेला जबरदस्त बळ मिळाले आहेच, पण इस्रायल मधले विरोधी पक्ष देखील सरकार बरोबरचे आपले राजकीय वैर विसरून हमासविरुद्धच्या “ऑल आउट वॉर” मध्ये सरकारला साथ द्यायला तयार झाले आहेत.

    इस्रायल छोटा देश असला तरी तिथे बहुपक्षीय लोकशाही आहे आणि तिथेही भारतासारखेच तीव्र मतभेद असणारे राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे इस्रायलमध्ये नेहमीच वेगवेगळ्या पक्षांची आघाडी सरकार येतात आणि जातात. पण तिथे राष्ट्रीय भावना एवढी प्रबळ आहे की इस्रायलच्या शत्रू विरुद्ध लढताना आपापसातले राजकीय वैर विसरून इस्रायल मधले सर्व पक्ष सरकारला साथ देतात आणि तशीच साथ हमास विरुद्धच्या युद्धात सरकारला देण्याचा निर्धार सर्व पक्षांनी केला आहे.

    काल बुधवारी इस्रायलच्या हवाई दलाने एकाच वेळी हमासच्या तब्बल 250 अड्ड्यांवर बॉम्बफेक करून ते उध्वस्त केले. त्यामध्ये 4600 हमास दहशतवादी मारले गेल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हमासला तर आधीच स्पष्ट इशारा देऊन ठेवला आहे, पुढच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा आम्ही शिकवू!!

    … आणि त्या दृष्टीनेच इस्रायलची दमदार पावले पडत आहेत. अमेरिकेचे शस्त्रबळ इस्रायलची ताकद वाढवत आहेत, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासारख्या प्रबळ देशाने देखील इस्रायलची पाठराखण केल्याने तिथल्या जनतेचे आणि सरकारचे बळ दुप्पट झाले आहे आणि त्यातच राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याच्या निर्णयामुळे इस्रायली एकजुटीची वज्रमुठ तयार झाली आहे आणि या वज्रमुठीने हमास संघटनेवर कुठाराघात करण्यासाठी इस्रायल सज्ज झाला आहे.

    Israel-Palestine war : ‘Hostile aircraft’ enters Israel from Lebanon

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!