• Download App
    Israel-Hamas War : ऑपरेशन अजय अंतर्गत १२०० भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती Israel Hamas War  1200 Indians repatriated under Operation Ajay Information provided by the Ministry of External Affairs

    Israel-Hamas War : ऑपरेशन अजय अंतर्गत १२०० भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

    इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जग दोन गटात  विभागले गेले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सध्या जगात दोन ठिकाणी युद्ध सुरू आहे. युरोपात रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू असतानाच आशियातील मध्यपूर्वेत इस्रायल आणि हमास आमनेसामने आले आहेत. हमास ही पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना असून त्यांना लेबनीज कट्टरतावादी संघटना हिजबुल्लाला पाठिंबा देत आहे. ही दोन्ही युद्धे जगासाठी मोठे आव्हान आहेत. भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन अजय संदर्भात मोठी माहिती दिली आहे. Israel Hamas War  1200 Indians repatriated under Operation Ajay Information provided by the Ministry of External Affairs

    इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जग दोन भागात विभागले गेले आहे. एकीकडे अनेक मुस्लिम देशांनी हमासला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अनेक देश दहशतवाद्यांविरोधातील या लढाईत इस्रायलच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्रायलला भेट दिली आणि तेल अवीवमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. अमेरिकेनेही इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

    दरम्यान, हमाससोबतच्या युद्धात इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. याअंतर्गत आतापर्यंत 1200 भारतीयांना युद्धक्षेत्रातून मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजय ऑपरेशन अंतर्गत 5 विमानांमध्ये 1200 लोक परतले आहेत, त्यापैकी 18 नेपाळचे नागरिक आहेत आणि विमानं पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पूर्वी गाझा पट्टीमध्ये सुमारे ४जण होते परंतु आमच्याकडे ठोस आकडेवारी नाही, वेस्ट बँकमध्ये 12-13 लोक होते. गाझामधील परिस्थिती अशी आहे की तेथून बाहेर पडणे थोडे कठीण आहे.

    Israel Hamas War  1200 Indians repatriated under Operation Ajay Information provided by the Ministry of External Affairs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य