• Download App
    इस्राईलमध्ये प्रथमच माजी अध्यक्षांचा मुलगा देशाचा नवा अध्यक्ष, हेरझॉग यांची निवड।Israel get new president

    इस्राईलमध्ये प्रथमच माजी अध्यक्षांचा मुलगा देशाचा नवा अध्यक्ष, हेरझॉग यांची निवड

    वृत्तसंस्था

    जेरुसलेम : इस्राईलचे ११ वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते आयझॅक हेरझॉग यांची निवड झाली आहे. त्यांना संसदेतील १२० पैकी ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. Israel get new president

    रझॉग हे लेबर पक्षाचे नेते असून त्यांचे वडिल काइम हेरझॉग यांनीही १९८३ ते १९९३ दरम्यान अध्यक्षपद भूषविले होते. माजी अध्यक्षांच्या मुलाची त्याच पदावर निवड होण्याची इस्राईलमधील ही पहिलीच घटना आहे.



    सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात विखारी संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडीला महत्व आले आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मताशी सहमत दर्शविणारे नेते म्हणून हेरझॉग यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे अध्यक्ष व पंतप्रधानाची जोडी आखातातील संघर्ष काबूत राखण्यासाठी कितपत उपयुक्त ठरते याकडे जगाचे लक्ष असेल.

    पुढील महिन्यात विद्यमान अध्यक्ष रोवेन रिव्हलीन निवृत्त यांचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर ९ जुलैपासून हेरझॉग यांची सात वर्षांची कारकिर्द सुरु होईल. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हेरझॉग यांचे अभिनंदन केले आहे.

    Israel get new president

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर