सोसाटाचा वारा आणि प्रमाणापेक्षा अधिक भार असल्यामुळे या नौका समुद्रात बुडाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.Islamabad: Two Pakistani fishing boats sank in the Arabian Sea, leaving 10 fishermen missing.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अल सिद्दीक आणि अल बहारी या दोन मच्छिमार नौका अरबी समुद्रामध्ये बुडाल्या आहेत.इब्राहिम हैदरी येथून या नौका मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेल्या होत्या. या नौकांवरील १० मच्छिमार बेपत्ता झाले आहेत.या नौका सिंध प्रांताच्या किनारयाजवळच्या थाता भागाजवळ समुद्रामध्ये बुडाल्या आहेत.
सिंध प्रांतातील या मच्छिमारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.असे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.सोसाटाचा वारा आणि प्रमाणापेक्षा अधिक भार असल्यामुळे या नौका समुद्रात बुडाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
सागरी सुरक्षा दलाने या नौकांवरील अंदाजे २५ मच्छिमारांना वाचवले आहे. मात्र अजूनही १० मचिछमार बेपत्ता असून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या १० मच्छिमारांच्या शोधाचे काम सुरू आहे , असे पाकिस्तान फिशर फॉक फोरमच्या प्रवक्त्याने सांगितले.
Islamabad: Two Pakistani fishing boats sank in the Arabian Sea, leaving 10 fishermen missing..
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने अरबीमध्ये केले ट्विट
- औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरुन राजकारण तापलं; राजपूत समाज झाला आक्रमक
- नांदेड : इटग्याळ गावात बाळासाहेब ठाकरे यांचे उभारण्यात आले मंदिर , मंदिराची सध्या राज्यभर चर्चा
- लातूर : दिवसाढवळ्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार , रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू