• Download App
    अफगाणिस्तानावर ताबा मिळवण्यासाठी इसिस आणि तालिबानमध्ये धडपड, दोन्ही दहशतवादी संघटना फोफावणार। ISIS,Taliban will hold in Afganistan

    अफगाणिस्तानावर ताबा मिळवण्यासाठी इसिस आणि तालिबानमध्ये धडपड, दोन्ही दहशतवादी संघटना फोफावणार

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : अफगाणिस्तानात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने राजधानी काबूल आणि परिसरावरील पकड मजबूत केली आहे. तर अन्य भागात तालिबानने बाजी मारण्यास सुरुवात कली आहे. अनेक प्रांतांमध्येही त्यांनी वर्चस्व निर्माण केले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दिली आहे. ISIS,Taliban will hold in Afganistan

    अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रिया थोपविण्यासाठी ‘इसिस’ने मोठ्या प्रमाणावर भरती आणि प्रशिक्षण सुरु केले आहे. अमेरिका आणि तालिबानमधील करार अमान्य असणाऱ्या नाराज तालिबानी दहशतवाद्यांनाही ते स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानात सध्या ‘इसिस’चे ५०० ते १५०० दहशतवादी असून येत्या काही महिन्यांत ही संख्या १० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



    एका बाजूला शांतता चर्चा करणाऱ्या तालिबानने अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार सुरुच ठेवला असून आज तालिबानी दहशतवाद्यांनी देशाचे हंगामी संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान महंमदी यांच्या घरावरच हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या बाँबफेकीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर हल्ला करणारे चारही दहशतवादी पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले. महंमदी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे सरकारने सांगितले. अफगाण सरकारने तालिबानी दहशतवाद्यांवर गेल्या आठवड्यात केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आजचा हा हल्ला असल्याचे तालिबानने म्हटले आहे.

    ISIS,Taliban will hold in Afganistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!