• Download App
    चंद्रबाबूंची राजकीय पावले पुन्हा एनडीएच्या दिशेने?; तेलगू देशम सोडून राज्यसभेत सर्व विरोधकांचा सभात्याग । Is chandrababu naidu ways back in NDA?; opposition barring telugu desam MPs walkout of rajaya sabha

    चंद्रबाबूंची राजकीय पावले पुन्हा एनडीएच्या दिशेने?; तेलगू देशम सोडून राज्यसभेत सर्व विरोधकांचा सभात्याग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशमची राजकीय पावले पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या दिशेने पडत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज राज्यसभेत 12 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ तेलगू देशम सोडून सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. या सभात्यागामध्ये तेलगू देशमचे २ खासदार सहभागी झाले नाहीत. Is chandrababu naidu ways back in NDA?; opposition barring telugu desam MPs walkout of rajaya sabha

    राज्यसभेत तेलगू देशमचे सध्या २ खासदार आहेत 2019 मध्ये एकूण ६ खासदार होते. परंतु त्यातील चार खासदारांनी तेलगू देशममधून बाजूला होत भाजपची वाट पकडली. त्यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही. पण आता आंध्र प्रदेशातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्वतः चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या एनडीए कडे वळल्याचे दिसत आहेत.



    आंध्र प्रदेशच्या राजकारणात वायएसआर काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांची पुरती कोंडी केली आहे. आपल्या पत्नीच्या अपमानाच्या विषयावरून चंद्राबाबू नायडू यांना भर पत्रकार परिषदेत मध्यंतरी रडूही कोसळले होते. राजकीय कोंडी झालेल्या स्थितीत ते नवा मार्ग शोधताना दिसत आहेत आणि तो मार्ग त्यांना एनडीएच्या रूपाने सापडल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आज सर्व विरोधी पक्षांबरोबर राज्यसभेतून सभात्याग करण्याऐवजी तेलगू देशमचे दोन का होईना पण खासदार सत्ताधारी भाजपबरोबर राहिलेले दिसतात.या पुढच्या काळात चंद्राबाबू हे कशा पद्धतीने एनडीए कडे पुन्हा वळतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

    Is chandrababu naidu ways back in NDA?; opposition barring telugu desam MPs walkout of rajaya sabha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य