• Download App
    संस्कृत बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशातील इरफान 83 टक्के गुणांसह अव्वल Irfan from Uttar Pradesh topper with 83 percent marks in Sanskrit board exam

    संस्कृत बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशातील इरफान 83 टक्के गुणांसह अव्वल

    इरफानला संस्कृत शिक्षक बनण्याची इच्छा आहे; जाणून घ्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाइटवर 10वी-12वीचा निकाल जाहीर केला आहे. विशेषबाब म्हणजे या परीक्षेत  मुस्लीम विद्यार्थी इरफानने बारावीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या निकालावर संपूर्ण कुटुंब आनंदी असून वडील सलाहुद्दीन यांना त्याचा अभिमान वाटत आहे. इरफानने उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषद मंडळाच्या उत्तर माध्यम-2 (वर्ग 12) परीक्षेत 82.71 टक्के गुण मिळवले आहेत. तर दुसरी टॉपर गंगोत्री देवी हिला 80.57 टक्के गुण मिळाले आहेत. Irfan from Uttar Pradesh topper with 83 percent marks in Sanskrit board exam

    इरफानला संस्कृत शिक्षक बनण्याची इच्छा आहे, तो त्याच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 20 विद्यार्थ्यांपैकी एकमेव मुस्लीम आहे. त्याने 12वी परीक्षेला बसलेल्या 13,738 विद्यार्थ्यांना मागे टाकले आहे. बलिया जिल्ह्यातील आदित्य इयत्ता 10वी परीक्षेत (पूर्व-माध्यमिक-2) 92.50 टक्के मिळवून अव्वल आला आहे.

    इरफानचे वडील सलाउद्दीन यांना विचारले की इरफानने संस्कृत शिकल्यानंतर काही अडचण आली का? यावर त्याने उत्तर दिले, ‘नाही, काही नाही. त्याने अभ्यासासाठी वेगळा विषय निवडला याचा मला आनंद झाला आणि मी त्याला प्रोत्साहन दिले. आम्ही मुस्लीम असल्यामुळे ही वेगळी निवड होती, पण इरफानला या विषयात रस होता. म्हणूनच मी थांबवले नाही. या गोष्टींनी आपल्याला काही फरक पडत नाहीत.

    सलाउद्दीन म्हणाले की, “फक्त हिंदूंनी संस्कृतचा अभ्यास केला पाहिजे आणि केवळ मुस्लिमांनी उर्दूचा अभ्यास केला पाहिजे या मताशी आम्ही सहमत नाही. जर तो प्राथमिक आणि कनिष्ठ वर्गात या विषयाचा अभ्यास करत असेल तर त्याने अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. त्यात गैर काय आहे? मला काहीही चुकीचे वाटत नाही. इरफानला संस्कृतचा आणखी अभ्यास करायचा आहे. मी त्याला पुढेही थांबवणार नाही.”

    10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल बुधवारी लखनऊमध्ये जाहीर झाले. 23 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत या परीक्षा झाल्या. सुमारे 70 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

    Irfan from Uttar Pradesh topper with 83 percent marks in Sanskrit board exam

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    GST Collection जुलैमध्ये GST संकलन 1.96 लाख कोटी रुपये; गतवर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ; जूनमध्ये GST मधून 1.85 लाख कोटी

    National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर : शाहरुख खान आणि विक्रांत मॅसी सर्वोत्तम अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री, ‘१२वी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

    Donald Trump : थायलंडसोबतचा सीमासंघर्ष थांबवल्याबद्दल कंबोडियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस; पाकिस्ताननंतर कंबोडियाचा दुसरा पाठिंबा