• Download App
    IRCTC's Budget Tour Package; Travel South India in Rs 13900, but how?, read in detail

    IRCTC चे बजेट टूर पॅकेज; १३९०० रुपयांत फिरा दक्षिण भारत, पण कसा?, वाचा तपशीलवार

    प्रतिनिधी

    मुंबई : देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना IRCTC मार्फत स्वस्त टूर पॅकेज दिले जात आहे. यामुळे प्रवाशांना बजेटमध्ये आपला देश फिरण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमुळे हौशी पर्यटक स्वस्तात दक्षिण भारत फिरू शकतात. IRCTC’s Budget Tour Package; Travel South India in Rs 13900, but how?, read in detail

    कोणत्या ठिकाणांना देता येणार भेट?

    साउथ इंडिया डिवाइन एक्स राजकोट या पॅकेजद्वारे पर्यटकांना तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देता येणार आहे. टूर पॅकेजचा खर्च १३ हजारांपासून सुरू होऊन प्रवाशांना जेवण आणि फिरण्यासाठी बसची सुविधा देण्यात येणार आहे. या टूर पॅकेजची सुरूवात २४ जानेवारी २०२३ रोजी गुजरातमधील राजकोटमधून होणार आहे.

    प्रवाशांना थर्ड एसीमधून प्रवास करता येणार आहे. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याचा समावेश असेल.


    Indian Railways : तुमच्याकडे तिकीट नसेल तरी आता नो टेन्शन ; काय आहे खास नियम


    किती दिवसांचा प्रवास असेल?

    हा संपूर्ण प्रवास ८ रात्री आणि ९ दिवसांचा असणार आहे. या पॅकेजमध्ये IRCTC मार्फत सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रवास स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनमधून होणरा आहे. या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी राजकोट, साबरमती, वडोदरा, कल्याण, पुणे या स्थानकांवरून आपला प्रवास सुरू करू शकणार आहेत.

    किती शुल्क?

    इकॉनॉमी टूर पॅकेज : १३ हजार ९०० रुपये प्रतिव्यक्ती

    स्टॅंडर्ड कॅटगरी पॅकेज : १५ हजार ३०० रुपये प्रतिव्यक्ती

    कंफर्ट कॅटगरी पॅकेज : २३ हजार ८०० रुपये प्रतिव्यक्ती

    – कुठे कराल बुकिंग ?

    irctctourism.com ला भेट देत प्रवासी आपल्या सहलीचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. याशिवाय IRCTC टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधून बुकिंग करता येईल.

    IRCTC’s Budget Tour Package; Travel South India in Rs 13900, but how?, read in detail

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे