• Download App
    हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने इराणी फूटबाॅलपटूला फाशीची शिक्षा Iranian football player sentenced to death for supporting anti-hijab movement

    हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने इराणी फूटबाॅलपटूला फाशीची शिक्षा

    वृत्तसंस्था

    तेहरान : इराणमध्ये मागच्या काही महिन्यांपासून देशव्यापी हिजाबविरोधात चळवळ सुरू आहे. ही हिजाबविरोधी चळवळ चिरडण्यासाठी इराणचे कट्टर इस्लामी सरकार आटापिटा करीत आहे. हिजाबविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इराणचा फुटबाॅलपटू अमीर नस्त्र अजादानी याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अजादानी हा  26 वर्षांचा असून एक प्रसिद्ध फूटबाॅलपटू आहे. Iranian football player sentenced to death for supporting anti-hijab movement

    अमीर नस्त्र-अजादानी याला नोव्हेंबर महिन्यात हिजाबविरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमीरवर इस्लामिक रिवाॅल्यूशनरी गार्ड काॅर्प्स कमांडरच्या मृत्यूचा आरोपही लावण्यात आला होता.

    मीडिया रिपोर्टनुसार, अमीर- नस्त्र-अजादानी एका हिजाबविरोधी आंदोलनात काही वेळासाठी सहभागी झाला होता. यावेळी त्याने इतर आंदोलकांसोबत मिळून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यानंतर अमीर नस्त्र-अजादानीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर ‘मोहरे बेह’ म्हणजे देवाविरुद्ध शत्रुत्वाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहरे बेह गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात येते.



     इराणची हिजाबविरोधी चळवळ

    सप्टेंबर महिन्यात 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने इराणमध्ये हिजाबविरोधी मोहिम निदर्शने सुरू झाली. महसा अमिनीला राजधानी तेहरानच्या भेटीदरम्यान, हिजाब व्यवस्थित न घातल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिचा मृत्यू झाला. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर, हिजाबविरोधी निदर्शने इराणमध्ये वणव्यासारखी पसरली आणि चळवळ अधिक तीव्र झाली.

    पण ही चळवळ चिरडण्यासाठी कट्टर इस्लामी इराणी सरकारने देशात मोठे दमनचक्र सुरू करून हिजाब विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्यांना फाशीची शिक्षा देण्याचा सपाटा लावला आहे. या सपाट्यातच इराणी फुटबॉलपटू अमीर नस्त्र आजादानी सापडला आहे..

    Iranian football player sentenced to death for supporting anti-hijab movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य