• Download App
    इराणी - ब्रिटिशांनी दिलेल नाव "इंडिया"; पण "भारत" नाव त्याहीपेक्षा प्राचीन!!; मराठी विश्वकोशात काय म्हटलंय वाचा!! irani- British name for India But the name Bharat is even more ancient

    इराणी – ब्रिटिशांनी दिलेल नाव “इंडिया”; पण “भारत” नाव त्याहीपेक्षा प्राचीन!!; मराठी विश्वकोशात काय म्हटलंय वाचा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जी ट्वेंटी परिषदेचे निमंत्रण “प्रेसिडेंट ऑफ भारत” या नावाने आल्याबरोबर काँग्रेस सह “इंडिया” आघाडीतल्या विरोधी पक्षांचे कान उभे राहिले. सोशल मीडियावर लिबरल जमात भारतीय संघराज्यावर घाला घातल्याची भाषा बोलू लागली. पण मूळात “इंडिया” अथवा “भारत” हे नाव आले कुठून?? या नावाची नेमकी उत्पत्ती काय?? याचा शोध वेगवेगळ्या घटकांनी घेतला असला तरी त्यामध्ये अधिक प्रमाण फेक न्युज पसरविण्याचेच काम दिसत आहे. irani- British name for India But the name Bharat is even more ancient

    त्यामुळे त्या पलीकडे जाऊन अधिकृत मराठी विश्वकोशाचा संदर्भ पाहिल्यावर इंडिया आणि भारत या दोन विभिन्न नामांचा उद्गम सापडतो. सिंधू नदीच्या पूर्वेकडील प्रदेशात राहणाऱ्या लोकांना इराणी लोकांनी “इंदूस” असे संबोधले. त्यानंतर पाचव्या शतकामध्ये ग्रीक भूगोल तज्ञांनी “इंडोस” असे संबोधले आणि त्यानंतर ब्रिटिशांनी विशेषतः युरोपियन पर्यटकांनी भारताला इंडिया संबोधायला सुरुवात केली. म्हणजेच इंडिया शब्दाचा उदगम इराणी आणि ब्रिटिश या संयोगातून पुढे येतो.

    पण भारत, भारत वर्ष, जम्बुद्वीप या नावाचा उद्गम त्याहीपेक्षा प्राचीन आढळतो. अजनाभ वर्ष, हैमावत वर्ष ही नावे वायुपुराणात आढळतात, तर कार्मुकु संस्थान कूर्म संस्थान ही नावे मार्कंडेय पुराणात आढळतात.


    https://vishwakosh.marathi.gov.in/40653/


     

    ऋग्वेदात वर्णन केलेल्या भरत नावाच्या मानव वंशाचे वससिस्थान म्हणून भारताचा पहिला उल्लेख आढळतो. ऋषभ देवाचा पुत्र भरत भारताचा सम्राट होता. तसेच दुष्यंत आणि शकुंतलाचा पुत्र देखील भारताचा सम्राट होता. म्हणून या देशाला भारत नाव पडले असावे, असे मराठी विश्वकोशात नमूद केले आहे.

    नाभिपुत्र ऋषभ देवाने आपला पुत्र भरत याला राज्याभिषेक करून हैमावत नावाचे दक्षिण वर्ष राज्यकारभारासाठी दिले. हेच हैमावत वर्ष भरताच्या नावावरून भारत रूपात समोर आले. वायु पुराणातील या उल्लेखाला मार्कंडेय पुराण आणि भागवत या दोन ग्रंथांमध्ये पुष्टी दिली आहे.

    हिमालयापासून ते सिंधू सागरापर्यंतची भूमी भरत वर्षाची सीमा असल्याचा उल्लेख विष्णु पुराणात आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये भारताचा उल्लेख जम्बुद्वीप, कुमारी द्वीप असा केला आहे, पण या सर्वांची सीमा मात्र एकच आहे आणि तिचा उल्लेख विष्णु पुराणानुसार हिमालय पर्वतरांगांपासून ते समुद्रापर्यंत आहे.

    अर्थातच अजनाभ वर्ष, हैमावत वर्ष, जंबुद्वीप कुमारी द्वीप, भारत ही सर्व नावे हिंदू, इंडॉस अथवा इंडिया या नावांच्या पेक्षाही प्राचीन आहेत. ही वस्तुस्थिती मराठी विश्वकोशातील उल्लेखाद्वारे अधोरेखित होते.

    irani- British name for India But the name Bharat is even more ancient

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!