• Download App
    इराणमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान, कट्टर नेता निवडल्यास अमेरिकेशी संबंध बिघडणार। Iran will choose new president

    इराणमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान, कट्टर नेता निवडल्यास अमेरिकेशी संबंध बिघडणार

    विशेष प्रतिनिधी

    तेहरान : मुस्लीम जगतातील महत्वाचा देश मानला गेलेल्या इराणमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान झाले. इराणचे सर्वोच्च धार्मीक नेते अयातुल्ला खोमेनी यांचेच तेथे वर्चस्व असल्याने निवडणुकांना फारसे महत्व दिले जात नाही. त्यांच्या मर्जीतील कट्टर नेत्याचाच विजय होण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने नागरिकांनी मतदानामध्ये फारसा उत्साह दाखविला नाही. Iran will choose new president

    इराण आणि अमेरिकेतील संबंध विकोपाला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे निवडणूक होत असल्याने तणाव निवळण्यासाठी तुलनेने मवाळ असलेले अब्दुलनासर हेम्मती यांच्या निवडीची जनतेला अपेक्षा होती. मात्र, खामेनी यांचा रायसी यांच्याकडेच कल असल्याने तेच निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.



    माजी अध्यक्ष हसन रोहानी यांचा कार्यकाल संपल्याने आणि घटनेनुसार त्यांना पुन्हा अध्यक्ष होता येत नसल्याने त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र, इब्राहिम रायसी आणि इतर तिघे जण पदाच्या शर्यतीत आहेत. इराणचे मुख्य न्यायाधीश असलेले रायसी हे कट्टरतावादी असून १९८८ मध्ये राजकीय नेत्यांच्या झालेल्या हत्यांशी त्यांचा संबंध आहे. अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्यास पदावर येण्याच्या आधीपासूनच अमेरिकेचे निर्बंध असलेले ते इराणचे पहिले अध्यक्ष ठरणार आहेत.

    Iran will choose new president

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार