कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गोव्यातील नाईट क्लबमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप झाल्यानंतर गृह मंत्रालयाने गोव्यात नियुक्ती असलेल्या आयपीएस अधिकारी ए कोआन यास तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. कोआन 2009 च्या बॅचचे AGMUT केडरचे अधिकारी आहे. गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर होता. IPS officer who molested female tourist in Goa club suspended by Home Ministry
कोआनने सोमवारी रात्री उशिरा राज्यातील एका बीच क्लबमध्ये एका महिला पर्यटकासोबत ती पार्टी करत असताना गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काय सांगितले होते? –
पोलीस अधिकाऱ्यावरील आरोपाबाबत राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वी सांगितले होते. “आम्ही त्याला त्याच्या कर्तव्यातून मुक्त केले आहे आणि त्याला मुख्य कार्यालयाशी जोडण्यात आले आहे. कारण, हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे, मला वाटते गृह मंत्रालय त्या अधिकाऱ्यावर कारवाई करेल.’’ असे ते म्हणाले होते.
IPS officer who molested female tourist in Goa club suspended by Home Ministry
महत्वाच्या बातम्या
- ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
- राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत
- मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!
- पवारांच्या बातम्यांनी माध्यमांचे भरले रकाने; पण शिंदे – फडणवीस निघाले वस्ताद घट्ट खुर्चीवर बसणारे!!